*सोलापूर--- प्रतिनिधी*
*आबिद बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
मुस्लिम धर्मीय तांबोळी व अत्तार जमात बांधवांसाठी जात पडताळणी साठी येणारे अडचणी दूर करणे बाबत मुस्लिम धर्मीय तांबोळी व आत्तार जमातच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन समस्यांचे निवारण करण्याची मागणी करण्यात आली असून
मुस्लिम धर्मिया तांबोळी व आता जमात बांधवांसाठी शैक्षणिक प्रगतीसाठी सतत जात पडताळणी कार्यालय कडून सदर समाज बांधवांना तांबोळी वअत्तार व्यवसायाचे प्रमाणपत्र मागणी करण्यात येते जात पडताळणी करताना आम्ही आमच्या जमातीचे शिफारस पत्र देत असतो तसेच त्या व्यक्तिरिक्त प्रमाणपत्र देताना अनेक अडचणी उभी करतात तेव्हा महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाकडील सदर समाजाचे ओबीसी प्रमाणपत्र असताना व तसा जी आर आपल्या कार्यालयाकडे असताना अडचण का निर्माण होते याचा उलगडा समाज कल्याण कार्यालय कडून होत नाही म्हणून मुस्लिम धर्मीय तांबोळी व अत्तार समाज बांधवांनी ओबीसी प्रमाणपत्र काढल्यानंतर त्यानुसार जात पडताळणी कार्यालयाकडून प्रमाणपत्र अधिकृत मानावे तसेच मुस्लिम धर्मिया तांबोळी अत्तार समाज संस्थेचे शिफारस पत्र अधिकृत व ग्राह्य धरण्यात येऊन भविष्य निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट प्रमाणपत्र मिळावा ही अपेक्षा आणि महाराष्ट्र शासनाकडून जिल्हास्तरीय जात पडताळणी कार्यालयात मुस्लिम ओबीसी समाज करिता स्वतंत्र विभागाची सोय करावी अशी मागणी मुस्लिम तांबोळी व अत्तार जमात सोलापूर शहर व जिल्ह्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते खाजाहुसेन अत्तार समाज संस्थेचे सचिव कय्युम तांबोळी युनूस तांबोळी मेजर रियाज अत्तार. हमीद तांबोळी पत्रकार युनूस अत्तार. या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदन द्वारे केली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा