Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ जानेवारी, २०२५

*संगम ता. माळशिरस येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न*

 


*उपसंपादक - नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी

माळशिरस तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर यांच्या अध्यक्षतेखाली संगम ता. माळशिरस येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरज व महाराष्ट्र शासन कृषी विभाग माळशिरस यांचे संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळावा दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाला .या शेतकरी मेळाव्यास संगम बाभुळगाव पंचक्रोशीतील 109 शेतकरी बांधव व सद्गुरु महाविद्यालय चे 11 विद्यार्थी,प्रगतशील शेतकरी ग्रामपंचायत सरपंच श्री नारायण ताटे देशमुख तसेच ग्रामपंचायतचे सदस्य इत्यादी मान्यवरांनी सहभाग नोंदवला.सदर प्रशिक्षणास श्री वीरेंद्र कुरुडकर युवा शेतकरी यांनी एकात्मिक संरक्षित शेती बाबत माहिती दिली.यारा फर्टीलायझर चे जिल्हाप्रमुख श्री अमोल जगदाळे यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल माहिती देऊन त्याचे महत्त्व पटवून दिले.डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान बाबत श्री गौरव कुबेर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.




कृषीनिष्ठ शेतकरी श्री विजयसिंह बालगुडे यांनी सेंद्रिय शेती व शेतीकडे वळाबाबत सल्ला दिला.सद्गुरु कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . रामदास बिटे यांनी एकात्मिक शेती पद्धतीचे महत्त्व पटवून दिले.या कॉलेजचे प्राध्यापक चांगदेव माने यांनी कृषी पूरक उद्योग दुग्ध व्यवसाय बाबत उपस्थित यांना मार्गदर्शन केले.संगम ग्रामसभा अधिकारी श्री अनिल घेरडे यांनी पारंपारिक शेती सोडून उच्च तंत्रज्ञानावर आधारित कमी क्षेत्रावरील आधुनिक शेती करणे बाबत आव्हान केले.सेवारत्न सतीश कचरे मंडल कृषी अधिकारी अकलूज आयएसओ 9001 :2015पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग,निर्यात क्षम शेतीसाठी शेवगा आंबा डाळिंब पेरू व सिताफळ यांच्या नोंदणी बाबत माहिती देऊन आव्हान केले व आपल्या मार्गदर्शनामध्ये ऊस पाचट व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी श्री आबासाहेब रुपनवर यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणात डाळिंब जीआय नोंदणी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन बाबत उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. श्री बळीराम जाधव कृषी पर्यवेक्षक व श्री रोहन गायकवाड कृषी सहाय्यक यांनीकार्यक्रमाचे नेटके आयोजन व नियोजन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गौरव माने व श्री संग्राम तोरडमल यांनी केले व आभार प्रदर्शन सुशांत सदाफुले यांनी करून कार्यक्रमाची सांगता उपस्थितताच्या स्नेहभोजनाने झाली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा