*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र तुळजाई नगरीतील जुने बसस्थानकाला अद्ययावत स्वरूपात सुरू असलेले बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असुन ते त्वरीत बंद करावे या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना शिवसेनेचे शाम पवार यांनी दिले आहे.
शाम पवार यांनी संमधीत विषयासंदर्भात धाराशिव जिल्हाधिकारी,विभागीय नियंत्रक परीवहन महामंडळ धाराशिव, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकार, म.रा. मा. प. महामंडळ, मुख्य अभियंता, म.रा. मा. प. महामंडळ,महाव्यवस्थापक मुंबई यांना यापूर्वी निकृष्ठ कामाबद्दल निवेदन दिले असून सदर निवेदनावर अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
परिवहन मंत्री तथा पालकमंत्री यांनी तुळजाई नगरीत होत असलेले बसस्थानक नूतनीकरण काम पाऊंडेशन मुळ डिझाईन प्रमाणे होत नसुन सदरील काम हे वाजवी दरापेक्षा जास्त असुन ते काम निकृष्ट दर्जाचे काम चालु असुन उत्कृष्ट दर्जाचे काम होत नाही त्यामुळे आपली व महाराष्ट्र शासनाची दिशाभुल करुन थतर मतर काम करीत आहेत याबाबत आपल्या स्तरावर वरील संदर्भ व विषयास अनुसरुन चौकशी करुन संबंधितावर कायदेशीर कार्यवाही व संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करण्यात यावा व श्री. क्षेत्र तुळजापुर येथील जुन्या बस स्टँडचे काम ईस्टिमेट प्रमाणे चांगल्या दर्जाचे काम करणा-या नवीन एजन्सी मार्फत काम करण्यात यावे. आशा मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा प्रमुख शाम पवार यांनी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा