Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २५ जानेवारी, २०२५

*महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला खुलासा ...* *नवीन जिल्हे निर्मिती बाबत कुठलाही प्रस्ताव शासनाकडे नाही*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

सध्या नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेला नाही. पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो, परंतु अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाची आस्थापना 100 दिवसांच्या आत उभारण्याचे आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते नागपूरात पत्रकारांशी बोलत होते. 


गेल्या काही दिवसांपासून राज्यात नवीन 21 जिल्हे तयार होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच 26 जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांबाबत राज्य सरकारकडून घोषणा करण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे.


माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाहीत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांवरचा वाढता ताण कमी करण्यासाठी काही जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी आणि त्याचे आस्थापना असा प्रस्ताव महसूल विभागाकडे आहे. राज्यात नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या आलेला नाही, मात्र याबाबत पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो. पण अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील काटोल, पुणे येथील मावळ आणि बारामती, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांची आस्थापना नेमण्याचा प्रस्ताव 100 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा विचार महसूल विभागाकडून करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा