*मंगरुळ ---प्रतिनिधी*
*चांदसाहेब शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा मंगरूळ तालुका तुळजापूर येथे बुधवार २२जानेवारी रोजी बाल आनंद मेळावा व माता पालक यांच्यासाठी हळदी कुंक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञानातही भर पडावी यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात होते यावेळी विद्यार्थ्यांनी घरी बनवून आणलेले खाद्यपदार्थ , शेतात पिकवलेल्या भाज्या , सौंदर्यप्रसाधने व स्टेशनरी साहित्य एकमेकांस व उपस्थित पालकांना विकून नफा तोट्याच्या ज्ञानाचे धडे गिरवले व हजारो रुपयांची उलाढाल केली यावेळी उपस्थित महिला मातांचा मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू लावून शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला व त्यांच्या विविध स्पर्धाही घेण्यात आल्या
याकार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच विजयालक्ष्मी डोंगरे व उपस्थित माता पालक यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच शाळेतील माता पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक उंबरकर यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती खाडे यांनी व आभार वाघमोडे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील श्रीमती मोरे , श्रीमती कोळसुरे , श्रीमती शिवकर , श्रीमती शिनगारे , बागवान, सुरवसे , इंगळे यांनी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा