*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने आज *"राष्ट्रीय विज्ञान दिन २०२५"* विविध वैज्ञानिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
विज्ञान दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात प्रथम व द्वितीय वर्ष बीएससी मायक्रोबायोलॉजी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनींनी सूक्ष्मजीवशास्त्राशी संबंधित वैज्ञानिक प्रकल्प सादर केले.यामध्ये रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी,किण्वन प्रक्रियेने निर्माण केलेले अन्नपदार्थ,दुग्धजन्य पदार्थ, वाईन निर्मिती,अल्कोहोल निर्मिती,सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी आवश्यक पद्धती, सूक्ष्मदर्शकाचा उपयोग इत्यादिचा समावेश होता.
या प्रकल्पाची इत्यंभूत माहिती जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना व गृहविज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांना देण्यात आली. यानिमित्ताने सूक्ष्मजीवशास्त्र विषयाची व्याप्ती व या विषयातील उपलब्ध करिअरच्या संधी व शैक्षणिक संधी यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.त्यासाठी संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे व सहसचिव हर्षवर्धन खराडे- पाटील यांचे आयोजनात सहकार्य लाभले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल सुर्वे,विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.अमित घाडगे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नांतून विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा