Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२५

*मुस्लिमांच्या 2 मिनिटांच्या अजान बाबत ढोंगी -राजकारण्यांचा -विरोध "अनाठायी"*--- *मिरवणुकीत डॉल्बी व फटाक्याच्या आवाजाने कर्णबधिरता येते त्याबद्दल आंदोलन व्हावे!...*


 

 *इकबाल बाबासाहेब मुल्ला "-(पत्रकार )सांगली*

मिरवणुकीत  "डॉल्बीमुळे" नागरिकांच्या कानाचे पडदे फाटतात, डॉल्बीच्या कर्कश आवाजाने वृद्ध लोकांना  हृदयविकाराचा  झटका येऊन त्यांचे "बळी" जातात, फटाक्याच्या आवाजाने "कर्णबधिरता"  येते, ज्या परमेश्वराविषयी. आपणास "आस्था" असते. त्यांच्यासमोर "नथमस्तक" होण्याऐवजी  मिरवणुकीत त्यांच्यासमोर  डान्स केला जातो, त्यांचा "अपमान"  केला जातो. 

2 मिनिटांची मुस्लिमांची "अजान" "बंद" करण्याऐवजी जनतेचे प्राण घेणाऱ्या डॉल्बीवर बंदीसाठी आंदोलन करा, आणि "कर्णबधिरता" आणणाऱ्या मोठ्या  फटाक्यांवर कारवाई करा, आणि परमेश्वराचा अपमान न होण्यासाठी, त्यांचा "आदर- सन्मान" करण्यासाठी जो "डान्स"  केला जातो तो प्रथम "बंद" करा आणि त्यानंतर शांतीपूर्ण- पद्धतीने आपली जीवनपद्धती अंगिकारणाऱ्या आणि सर्वधर्मसमभाव- असणाऱ्या मुस्लिमांच्या अजांनबद्दल बोला....!

2 मिनिटाच्या अजानचा कोणालाच त्रास  होतं नाही हें सत्य कोणीही नाकारू शकणार नाही .

राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि स्वतःचे "महत्व" सिद्ध करण्यासाठी आज वारंवार मुस्लिमांचा "वापर"  करावा लागतो.भारतात 1840 धर्म - जाती असताना केवळ मुस्लिमांचे नावं   घेऊनच आर्थिक - राजकीय - सामाजिक फायदा करता येतो हें त्रिकालाबाधित "सत्य" आहे. यावरूनच मुस्लिमांचे महत्व अधोरेखित होते असे म्हंटले तर "वावगे" का ठरावे ??

नुकताच झालेल्या कुंभमेळ्यात मुस्लिमांनी हिंदू भाविकांना जेवण -पाणी आणि तब्बल 25000 चादर दिल्या.स्वतःच्या "घरात" राहण्याची व त्यांच्या "टॉयलेटची"  सोय केली. तेथील मुस्लिमांच्या मस्जिदमध्ये कित्येक भाविकानीं "विश्रांती"  घेतली. मस्जिद मधून जाताना हिंदू भाविकांच्या डोळ्यात - हिंदू महिलांच्या डोळ्यात   आनंदाश्रू तरळले. "गोदीमीडिया" हें कदापि सांगणार नाही.



बहुजन  मुलांच्या भावना भडकावणाऱ्या जातीयवाद्यांनो .. "सहकार्य"  व मदत करणारा हा इस्लाम आहे,आणि एकोपा  जपणारे असे  "मुस्लिम" आहेत हें लक्षात घ्या. इस्लाम हा मानवतावाद  एकमेकांना "मदत" करणारा धर्म आहे.परंतु जातीयवादी जाणीवपूर्वक त्यांना बदनाम करतात.

मुस्लिमांचे नावं न घेता राजकीय "फायदा" करता येणार नाही,आपली पत. वाढणार नाही, हे  जातीयवादी  चेहऱ्याना माहित आहे. म्हणून वारंवार मुस्लिम - अजान - दर्गाह   याचे विषय काढून धार्मिक उन्माद. वाढवण्याचा  केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न केला जातो. 



कोणीही कितीही "आंदोलन" केले तरी माझ्या या भारतात शांती, सदभाव आणि सर्वधर्मसमभाव चिरंतर "जिवंत" राहणार आहे. ढोंगी राजकारयांचे आंदोलन  हें  "अनाठायी" आहे हें सर्वानी ओळखले आहे.                               


. *इकबाल  बाबासाहेब  मुल्ला*

(*पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा