Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

*सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची पुण्यतिथी साजरी*

 


*अकलूज ----प्रतिनिधी*

*एहसान. मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज, दि. ११ येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अभियांत्रिकी महाविद्यालयात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची ४६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांच्या हस्ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कॉम्प्युटर विभागामधील प्रा. श्रेया देशमुख यांनी जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करुन दिला. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे सर यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या कार्याची माहिती दिली आणि त्यांच्या कार्याची ज्योत कायम आपल्या कामातून तेवत ठेवूया असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मीनाक्षी राऊत मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे सर, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा