*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सोशल मिडिया वरून धाराशिव लाइवचे सुनील ढेपे यांच्याकडून दिलीप गणपतराव जोशी व शेतकऱ्यांची नाहक होत असलेली बदनामी तत्काळ थांबवावी व त्याला पायबंद करावे तथा शेतकरी संघर्ष समिती याविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन
शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सरदार सिंग ठाकूर आणि तुळजापूर तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील आणि समस्त शेतकरी वर्ग व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नळदुर्ग तालुका तुळजापूर येथील नळदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिले असून याबाबत सविस्तर माहिती अशी की
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग अक्कलकोट सोशल मिडिया वरून "धाराशिव लाइवचे -सुनील ढेपे" यांच्याकडून दिलीप गणपतराव जोशी व शेतकऱ्यांची नाहक बदनामी केली जात असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग अक्कलकोट शेतकरी संघर्ष समिती व समस्त शेतकरी यांच्या वतीने गेल्या ६ ते ७वर्षापासून समितीचे समन्वयक दिलीप गणपतराव जोशी व आम्ही सर्व बाधित शेतकरी आमच्या मालकी हक्काच्या जमिनी रस्ता कामासाठी बाधित झालेल्या क्षेत्राचा मोबदला मिळावा यासाठी लोकशाही मार्गाने न्यायालय व रस्त्यावर उतरून तसेच निवेदने व आंदोलने करून न्याय मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु गेल्या २ ते ३ दिवसापासून धाराशिव लाइवचे सुनील ढेपे यांच्याकडून बिन बुडाचे आरोप करीत दिलीप गणपतराव जोशी व शेतकऱ्यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न करून समन्वयक दिलीप गणपतराव जोशी यांना जाणीवपूर्वक बदनाम करून शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्कापासून परावलंबित करण्याच्या उद्देशाने नाहक बदनामी करीत आहे मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने दिलेल्या निकालावरून बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या जमिनीचा मोबदला मिळण्याच्या आशा निर्माण झालेले असताना समितीचे समन्वयक दिलीप गणपतराव जोशी हे शहापूर ता तुळजापूर गावाचे रहिवाशी असून त्यांची वडिलोपार्जित जमीन गट न १३६ या गटामध्ये मा मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने दिलेल्या आदेशाप्रमाणे दिनांक २०/०१/२०२२ रोजी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर यांच्या भूमापकांनी केलेल्या मोजणी अहवालाप्रमाणे त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचे क्षेत्र कामासाठी बाधित झालेले असून त्यांनी आमच्या 130 शेतकऱ्यांकडून ३० हजार रुपये घेतले असे बिन बुडाचे दिशाभूल करणारे खोटे व चुकीचे आरोप करून त्यांची बदनामी करून आमच्या संघटनेचे होत असलेली यशस्वी वाटचाल थांबवण्याचे काम केले जात आहे सर्व शेतकऱ्यांनी एका दिलाने आमच्या जमीन बाधित होत असलेल्या क्षेत्राचा मोबदला मिळावा आणि शेतकऱ्यांना त्यापासून गेल्या पाच सहा वर्षापासून नाहक बदनामी करण्याचे हे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून त्यांच्यावरती शेतकऱ्यांची सुद्धा त्या ठिकाणी बदनामी करण्याचे काम या सोशल मीडियावरून धाराशिव लाईव्ह चे सुनील ढेपे माध्यम आतून केल्यास आम्ही सर्व बाधित शेतकरी आंदोलन करणार असून अशा खोटारड्या चे आरोप करणाऱ्या सुनील ढेपे यांनी केलेल्या आरोपाचे चौकशी करून त्यांच्याकडून पुरावे घ्यावे चौकशी करून बिनबुडाचे आरोप करणाऱ्या व शेतकऱ्याची बदनामी करणाऱ्या सुनील ढेपे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी सात दिवसाच्या आत त्याच्यावरती खोटी बदनामी करून बिनबुडाचे आरोप केलेल्या सुनील ढेपे यांच्यावर चौकशी करून कारवाई न केल्यास शेतकरी संघर्ष समिती नळदुर्ग हे नळदुर्ग बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांना बदनाम करणाऱ्या अशा सुनील ढेपे यांच्या प्रतिमेला जोडणे करण्यात येईल याची दखल घेऊन दिलीप जोशी व शेतकरी यांची नाहक बदनामी करणाऱ्यावर तात्काळ त्यां
त्याच्यावर कारवाई करावी अशी ही मागणी निवेदनाद्वारे केली आहे
तसेच सुनील ढेपे यांनी प्रसिद्धी माध्यमातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विरोधात केलेली बदनामीचे पुरावे ही नळदुर्ग पोलीस प्रशासनास देण्यात आले आहेत.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा