Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

*कोडोली जि. कोल्हापूर येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅककडून बी मानांकन प्राप्त.*

 


*कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*

  *प्रा. डॉ.-- विश्वनाथ पाटील*

   *टाइम्स 45 न्यूज मराठी

बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने (नॅक) कोडोली (ता.पन्हाळा) येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंत शिक्षणशास्त्र (बी.एड.कॉलेज)महाविद्यालयास 'बी' मानांकन दिले असल्याचे प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांनी सांगितले. दि.१३ व १४ फेब्रुवारीला या महाविद्यालयास चेअरमन निशानसिंग देओल (पंजाब),समन्वयक जिनेंद्र राउत (मध्यप्रदेश), डॉ.विजयकुमार एक्झांबी (कर्नाटक) यांच्या समितीने भेट देवून पाहणी केली होती.

            पन्हाळा व जोतिबाच्या पायथ्याशी असलेल्या या डोंगरी विभागातील या महाविद्यालयाची स्थापना दि.१ सप्टेंबर १९९० रोजी माजी आमदार कै.यशवंत एकनाथ पाटील यांनी केली आहे. दोन दिवस समितीने महाविद्यालयाच्या विविध विभागांची पाहणी करत नावीन्यपूर्ण उपक्रमांची व राबविलेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेतली,आजी-माजी विद्यार्थी,पालक,सरावपाठ शाळा यांच्याशी संवाद साधला.तासभर विद्यार्थ्यानी सादर केलेल्या विविधगुणदर्शन कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला.संस्था चालकांशी संवाद साधून संस्थेची माहिती घेतली.नॅक समन्वयक प्रा.एस.डी.रक्ताडे,सर्व प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी आणि ग्रंथपाल यांनी परिश्रम घेतल्याचे प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.

        नॅककडून महाविद्यालयास ' बी ' श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे सेक्रेटरी डॉ.जयंत पाटील,विश्वस्त विनिता जयंत पाटील,संस्थेच्या अध्यक्षा पद्मजा प्रदीप पाटील,मानद सरसचिव व्ही.डी.पाटील,प्रशासकीय अधिकारी पुंडलिक पाटील आदींनी महाविद्यालयाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.बी. एड.महाविद्यालयाच्या गुणवत्तेसाठी संस्थापक अध्यक्ष कै.यशवंत एकनाथ पाटील आणि व्यवस्थापक कै.प्रदीप पाटील हे सतत जागरूक असत.त्यांचाच वसा आणि वारसा डॉ.जयंत पाटील आणि विश्वस्त मंडळाने पुढे चालविल्याचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा