*इक्बाल बाबासाहेब मुल्ला( पत्रकार)*
*सांगली*
*मो:-8983 587160
क्रूर *काळाने* लहान - निष्पाप असणाऱ्या मुआज चा *बळी* घेतला असून इवल्याश्या हसऱ्या - गोड मुआज हें सुंदर *जग* पाहण्याआधीच अल्लाहला प्यारा झाला आहे. *मुआजच्या* जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर विशेषतः तिच्या *आईवर* "दुःखाचा" डोंगर कोसळला असून त्यांच्यावरच "उपचार" करण्याची वेळ आज आलेली आहे.
*नियतीने* आज डाव साधला आणि संपूर्ण कुटुंबाला *अश्रूच्या* समुद्रात ठेवत,अथक प्रयत्न करणाऱ्या ,त्याचे *प्राण* वाचण्यासाठी धडपडणाऱ्या शेकडो हातांना *पोरके* करत ,मुआज पून्हा एकदा घरी यावा, तो बरा व्हावा म्हणून हजारो लोकांनी जी *दुवा- प्रार्थना* केली त्यांना मागे ठेवत मुआज *स्वर्गात* स्थानापन्न झाला आहे.
8 दिवसापूर्वी मुआज *भारती हॉस्पिटल* मध्ये ICU मध्ये असल्याचे समजल्यापासून मी तो बरा होण्यासाठी दररोज अपडेट घेत होतो, मुआज चे आजोबा *जमीर पाथरवट* यांना फोन करत होतो. माझ्यासह कित्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी मुआज साठी "प्रयत्न" केले.
मी स्वतः *पालकमंत्री चंद्रकांत पाटील* , खासदार विशाल पाटील ,आमदार सुधीर गाडगीळ, यांच्याशी संपर्क साधत भारती हॉस्पिटल मध्ये मुआज ला *सर्वोत्तम उपचार* मिळण्यासाठी "प्रयत्न" केले. मुआजला आर्थिक मदत मिळण्यासाठी, मेडिकल चा "भार" कमी होण्यासाठी *सोशल मीडियावर* "आवाहन" केले. वाचकांनी देखील त्यांना *भरघोस मदत* केली. आज मदत मिळाली आहे, उपचार व्यवस्थित होतं होते परंतु छोटा मुआज आपल्यात नाही याचे फार दुःख होतं आहे. मुआज परत ये बाळा ..मुआज परत ये ...!
गेल्या 8 दिवसात मुआज साठी *महात्मा फुले योजनेसाठी* सुफियान पठाण,आयुब बारगीर यांनी प्रयत्न केले. मयूर पाटील, सुजित राऊत, तोफीक शिकलगार यांनी भारती हॉस्पिटल मध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांना मदतीचे आवाहन केले .
कित्येक ज्ञात - अज्ञात व्यक्तींनी मुआज बरा होण्यासाठी प्रयत्न केले.परंतु मुआज आपल्याला सोडून दूर गेला आहे.
मुआज *इम्यॅन्युएल इंग्लिश स्कूल* येथे शिकतो. मुआज चा जिवलग मित्र माझा मुलगा *सुहेब* याला आम्ही ही *दुःखद घटना* सांगितलेली नाही. पण तो जिवंत आहे हें समजून सुहेबने मुआज ला पाहण्यासाठी *हॉस्पिटल* ला जाऊया असा "तगादा" लावला आहे. आता मुआज ला मी कुठून आणू ??? मुआज ला मी कोठे *शोधू* ???
अतिशय गोड - सुस्वभावी मुआज आणि सुहेब ची जोडी आज *तुटली* आहे याचे मला व माझ्या कुटुंबियांना मनस्वी दुःख आहे. त्याच्या *गोड आठवणी* चिरंतर आमच्या "स्मरणात" राहतील .कुठल्याही हॉस्पिटल मध्ये गेल्यावर *सेकंड ओपिनियन* आवर्जून घ्यावे हा "धडा" आज मिळाला. आता मुआज आमच्यात नाही.त्यामुळे कोणीही गुगल पे आणि फोन पे वर *पैसे* मारू नयेत ही नम्र विनंती मुआज च्या कुटुंबीयांनी केली आहे.
परमेश्वर मुआजला "स्वर्गप्राप्ती" देवो ही प्रार्थना !
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा