उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील गणेशगांव येथील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येवून ३९५ वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. फटाक्यांची आतिषबाजी व हलग्यांच्या कडकडाटात,जयघोष करीत मोठ्या उत्साहात व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे "जय शिवाजी जय भवानी"अशा घोषणा देत धुमधडाक्यात भाषण करून छत्रपती शिवरायांच्या प्रती आदर व प्रेम व्यक्त केले.
सकाळी महाराजांच्या पावन मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करून अभिवादन करण्यात आले तसेच स्वराज्याचे प्रतीक भगवा ध्वजाचे पूजन गणेशगांवचे सरपंच सदाशिव शेंडगे यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच गणेशगांवचे माजी सरपंच पोपट रुपनवर,श्रीमंत शेंडगे, माजी उपसरपंच महादेव मोरे, मा.सरपंच शरफुद्दीन कोरबु लक्ष्मण दादा यादव,नसरुद्दीन शेख,कुंडलिक ठोकळे,नागेश मदने,विजय यादव,कुंडलिक शेंडगे, पोलीस पाटील भाईसाहेब शेख,तंटामुक्ती अध्यक्ष गणपत वाघ,आबासाहेब बाबर,रहीम अली शेख,हमीद कोरबु व शिवशंभु प्रतिष्ठान ग्रुप यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माऊली मदने यांनी केले. सायंकाळी व्याख्याते सचिन शिंदे यांचे व्याख्यानाचे आयोजन केले गेले होते.सर्व ग्रामस्थांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा