Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

*राजन साळवींच्या पदाधिकाऱ्यांत प्रचंड नाराजी--- साळवींचा शिंदे सेनेतील प्रवेश ठरणार आऊट घटनेचा..... पदाधिकारी देणार राजीनामे?...*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

राज्याच्या राजकारणात काल मोठी घडामोड घडली. उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ म्हणवले जाणारे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. शिंदेसेनेचं बळ वाढल्याची चर्चा सुरू झाली. पण ही चर्चा औटघटकेचीच ठरली आहे. राजन साळवी यांनी धनुष्यबाण हाती घेतात कोकणातील शिंदे गटात नाराजीचे फटाके फुटू लागले आहेत. साळवींच्या पक्षप्रवेशानंतर राजापूर लांजा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे. मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेक कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पदाधिकाऱ्यांनीही थेट इशाराच दिला आहे.


राजन साळवी यांचे भूत आमच्या डोक्यावर नको. शिंदे साहेबांनी त्यांना आमच्यावर लादू नये आणि जर हा पक्षप्रवेश झालेला आहे तर राजन साळवी यांची कोणतीही ढवळाढवळ आमच्या मतदारसंघात होऊ देणार नाही असा इशारा नाराज पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. राजन साळवी यांना विकास करायचा असेल तर त्यांनी तो अन्यत्र कुठेही करावा. पण आमच्या मतदारसंघात 15 वर्षात काय विकास केला तो दिसून आला आहे. ज्यांना मतदारांनी नाकारलं अशा आमदाराला पुन्हा आमच्या डोक्यावर बसवू नये. त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही. आम्ही कोणतेही काम करणार नाही असे मत नाराज शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.


राजन साळवी यांच्या हाती धनुष्यबाण..


गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाण्यामध्ये गुरुवारी 13 फेब्रुवारीला दुपारी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशानंतर कोकणात काय समीकरणं बदलू शकतात. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा