*श्रीपूर --बी.टी.शिवशरण.
महाराष्ट्रातील खंडकरी शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडून त्यांच्या जमिनी ताब्यात देताना कागदपत्रांची पूर्तता पुर्ण न केल्याने खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी निष्कारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडून खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी ताब्यात देताना सदर जमीनीचे सातबारा उतारे तसेच वर्ग दोन चा एक वर्ग तसेच सदर उतारावरील महाराष्ट्र शासनाचे नाव कमी करुन संबंधित उतारावर त्या खंडकरी शेतकरी याचे नाव क्रमप्राप्त लागणं आवश्यक होते पण अडलेल्या व अडचणीत असलेल्या शेतकर्यांना आता नाहक आर्थिक भुर्दंड सोसून महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडून खंडकरी शेतकऱ्यांना मिळालेल्या जमिनीवर असलेलं महाराष्ट्र शासनाचे नाव कमी करुन घ्यावं लागणार आहे तसेच वर्ग दोन चे वर्ग एक करून घ्यावं लागणार आहे भाडे पट्टा दाखला यावरून पुन्हा नव्याने सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महसूल विभाग यांच्या कडे पाठपुरावा व हेलपाटे मारायला लागणार आहेत यासाठी मधले दलाल व महसूल प्रशासन यांची भरमसाठ वसुली भागवावी लागणार आहे या साठी वास्तविक पाहता संबंधित खंडकरी शेतकरी यांनी एकत्रीत येऊन यांवर आवाज उठवणे गरजेचे ठरणार आहे वेळप्रसंगी या निर्णयाला आव्हान देण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याची तयारी करावी लागेल त्या शिवाय खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही खंडकरी शेतकऱ्यांना जमीन दिली आहे मग शासनाचे नांव कमी का केले नाही तसेच वर्ग दोन चे वर्ग एक करून दाखला का दिला नाही असे प्रश्न विचारले जात आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा