*अकलूज ----प्रतिनिधी*
"*शकूरभाई तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी अकलूज
अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा.
भारतीय साहित्य वर्तुळातील कुसुमाग्रज म्हणून प्रसिद्ध असलेले प्रख्यात मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.प्रमुख अतिथी डॉ विश्वनाथ आवड हे होते.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, वि.वा.शिरवाडकर,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,वासुदेव,राजमाता जिजाऊ,संतकवी मुक्ताबाई, बहिणाबाई, शांता शेळके इत्यादींच्या वेशभूषा साकारली होती.
सर्वप्रथम अकलूज परिसरातील मुख्य रस्त्यावरून ग्रंथ दिंडीची मिरवणूक काढण्यात आली.विद्यालयातील वाद्यवृंदाने मराठी गौरव गीत सादर केले.त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा व मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्रतरंग या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. चि सुमित खामगळ व शिक्षिका लक्ष्मी अस्वरे यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ विश्वनाथ आवड यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळी उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे,उपप्राचार्य झाकीर सय्यद,व्यवसाय विभागाचे उपप्राचार्य भारत शिंदे,सर्व विभागाचे पर्यवेक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन तेजश्री माने तर आभार अंजली कदम यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा