*दसुर ---प्रतिनिधी*
*संजय. निंबाळकर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
दसूर ता.माळशिरस जि. सोलापूरयेथे बिबट्याने दोन व्यक्तीवर हल्ला केला असून हल्ल्यामध्ये शेतकरी "चंद्रकांत रामचंद्र रणवरे" हा जखमी झाला आहे बिबट्या शेतकऱ्यावर हल्ला करून पळत असता पंढरपूर-- माळशिरस रस्त्यावर दसुरपाटी जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्या दसूर पाटी येथे गतप्राण झाला दुसरे दोन बिबटे दसुर पाटी ,केसकरवाडी, मुजावर फाटा, या दिशेने गेलेला आहे असे सांगितले जाते तरी नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले
मागील महिन्याभरापासून धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात १ वाघ २ बिबट्यांचा वावर निदर्शनास आल्याने या जिल्ह्यात नागरिक भयभीत झाली असताना आता बिबट्याचा सोलापूर जिल्ह्यात वावर दिसुन आल्याने नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे तरी वन विभाग तातडीने याचा बंदोबस्त करतील का ?असेही नागरिकातून बोलले जात आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा