*श्रीपूर--बी.टी.शिवशरण,
महाराष्ट्राचेच नव्हे तर तमाम भारतवासीय यांचे श्रद्धास्थान आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक बोलण्याचा उन्माद मस्ती व बेशरमांची हद्द ओलांडण्याची हिंमत कोण प्रशांत कोरटकर याने केलीच कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे इतिहास संशोधक व अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून त्यानं जी भाषा वापरली आहे हे महाराष्ट्रात पुन्हा मनुवादी व्यवस्था निर्माण होते की काय ही भिती वाटत आहे त्याला एवढी मग्रुरी कशी काय आहे त्याचा बोलविता धनी अन्य कोण आहे हे तपासण्याची गरज आहे इंद्रजित सावंत यांना धमकी व अरेरावी करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अत्यंत तुच्छ व एकेरी उल्लेख करत महाराजांबद्दल त्यानं गरळ ओकली आहे तरीही एरवी महाराष्ट्रात छत्रपतींचे नाव घेऊन गल्ली ते दिल्ली राजकीय पोळी भाजून घेऊन आपल्या नेतृत्वाची टिमकी वाजवून मिरवणारे आता कुठल्या बिळात लपून बसलेले आहेत एरवी छोट्या क्षुल्लक कारणावरून गल्लीत गावात शहरात गुरगुरणारे कोणाला घाबरून त्या कोरटकर याचा निषेध नोंदवायला सुध्दा पुढं आले नाहीत ही खेदजनक व लाजिरवाणी बाब आहे कोरटकर याचा आगाऊपणा व मस्ती उतरायला संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा निषेध बंद धिक्कार व आंदोलन झालं पाहिजे त्याला त्याची लायकी दाखवण्यासाठी महाराष्ट्र एक झाला पाहिजे म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावता कामा नये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्यांचा मेंदू सडला आहे बुध्दी भ्रमिष्ट झाली आहे अशा निच हलकट नराधम याला कोण पाठिशी घालत आहे तो कोणाचा कार्यकर्ता आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कळलं पाहिजे तो सध्या फरार आहे की त्याला वाचवण्यासाठी त्याला लपवलं आहे हे समजायला मार्ग नाही तो उद्या परवा सापडेल परंतु त्याच्या निच प्रवृत्ती विरोधात आवाज उठवावा लागणे हे लाजिरवाणे आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा