*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील शंकरराव मोहिते महविद्यालयामध्ये कवी कुसूमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख अथिती म्हणून भारुडकार नागनाथ साळवे,विलास शिंदे,आकाश साठे व नवनाथ कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारुडकार साळवे यांनी मराठी भाषेचा अभिमान असणा-या सर्व मराठी साहित्यिकांना व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसूमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर,वि.स.खांडेकर,विं.
दा.करंदीकर व भालचंद्र नेमाडे यांना वंदन केले.त्यांनी संत एकनाथ महाराजांच्या भारूड सादरीकरणातून उपस्थिती विद्यार्थी विद्यार्थ्यीनींना संताच्या विचाराचा,मराठी प्रेमाचा, अभिमानाचा,मराठी भाषा ही अमृताहून गोड असल्याचा संदेश दिला.आपल्या कलापथकातून त्यांनी वेडी झाली...,दादला नको ग बाई... ही संत एकनाथांची भारूडे,गौळणी,लावणी,भावगीते सादर करून प्रबोधन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, अभिजित रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद डॉ.सतिश देवकर,डॉ.विश्वनाथ आवड,डॉ.शिरीषकुमार शिंदे,डॉ. सज्जन पवार,डॉ.चंद्रशेखर ताटे, प्रा.चव्हाण,सौ.मिले मॅडम, कार्यालयीन निबंधक राजेंद्र बामणे,अधिक्षक युवराज मालुसरे व विद्यार्थी,विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा़.विनायक सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचलन डॉ. जनार्धन परकाळे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा