*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील २५/४ लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.या कार्यक्रमाचे उद्घाटक लवंग ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रशांत पाटील यांच्या हस्ते माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले व एम.बी.एस. डॉ.प्रतीक्षा ठोंबरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी.शोभा वाळेकर सरपंच तांबवे,सदाशिव शेंडगे सरपंच गणेशगाव ,लवंगचे माजी सरपंच उत्तम भिलारे,विश्वंभर वाघ, उद्योजक हनुमंत चव्हाण,माजी सरपंच उषा रामचंद्र ठोंबरे गणेशगाव,सचिन कोळेकर, रणजित चव्हाण,रामदादा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदी,मराठी व इंग्रजी गीतांवर चिमुकल्या बालकांनी बहारदार नृत्य केली,मजेदार उखाणे,पंचक्रोशीतील विनोदी बातम्या सादर करून प्रेक्षकांना हसविले तर माता - पित्याविषयी आदर प्रेम व्यक्त करणाऱ्या हृदयस्पर्शी कविता माझा बाबा - स्वतः " घेतो काळा चहा मला देतो ग्लासभर दूध, आई - " ठेच मला लागताच तुझ्या डोळ्यात पाणी कसे येते " अशा काळजाला भिडणाऱ्या शब्दांची बरसात करीत कविता सादर केली.त्याप्रसंगी सर्व उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.यावेळी शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ठ गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे,रुबाब आतार,अल्ताफ शेख,डॉ.प्रतीक्षा ठोंबरे,शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख, जैनुद्दिन शेख,यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक,मेडल व गुलाबपुष्प देवून गुणवंत विद्यार्थ्याना गौरविण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिद्रा मोहम्मद उमर शेख यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पालक संघाचे अध्यक्ष नीलेश वाघ, उपाध्यक्ष महादेव कोळेकर, महिला पालक संघ अध्यक्षा शीतल भुजबळ,उपाध्यक्षा माया कोळी,शिक्षिका गुलशन शेख, तमन्ना शेख,भीमराव शिंदे,रेडे पाटील यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा