Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

*महाराष्ट्र ग्रामीण साहित्य विकास मंडळाच्या अध्यक्षपदी-- सूर्यकांत भिसे -उपाध्यक्षपदी प्रा. विष्णू सुर्वे तर सचिवपदी --तानाजी बावळे*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

महाराष्ट्र ग्रामीण साहित्य विकास मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यीक सूर्यकांत भिसे यांची निवड करण्यात आली आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने माळशिरस तालुक्यातील साहित्यीकांची बैठक पार पडली या बैठकीत संघटनेची कार्यकारणी निवडण्यात आली . 

         अध्यक्षपदी सूर्यकांत भिसे,उपाध्यक्षपदी प्रा.विष्णू सुर्वे,सचिवपदी तानाजी बावळे, खजिनदारपदी सुहास उरवणे तर सदस्यपदी विरेंद्र पतकी,गणपत जाधव,जयंत बोबडे,सौ.संजीवनी घोडके व सौ स्वाती कळसुले यांची निवड करण्यात आली . 

         महाराष्ट्र ग्रामीण साहित्य विकास मंडळ,अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय वेळापूर व इंग्लिश स्कूल,वेळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्ताने गुरूवारी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजता वेळापूर येथील इंग्लिश स्कूलमध्ये ज्येष्ठ साहित्यीक सुहास उरवने यांचें " माझा मराठीची बोलू कौतुके l परि अमृतातेहि पैजासी जिंके।" या विषयावर व्याख्यान तसेच दुपारी तीन वाजता धानोरे येथे ज्येष्ठ कवी तानाजी बावळे,विरेंद्र पतकी,सौ.प्रतिभा गोडसे,गणेश गोडसे,सुहास उरवणे व जयंत बोबडे या मान्यवर कवींचे काव्य वाचन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

          या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष प्रा विष्णु सूर्वे,प्राचार्य मनोजकुमार नांगरे व आर.बी. पवार यांनी केले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा