*श्रीपूर --बी.टी.शिवशरण
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव व सध्या महाराष्ट्रातील समाजकारण राजकारण यामध्ये सक्रिय राजकारणात आघाडीवर राहिलेले विजयसिंह मोहिते पाटील यांचा शाही विवाहसोहळा व त्या विवाह सोहळ्यात उपस्थितांना दिलेलं लक्ष भोजन यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांचे लग्नाची चर्चा देशभरच नव्हे तर विदेशातही बातम्या मुळे झाली सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील हे आमदार व काँग्रेसचे महाराष्ट्रातील वजनदार नेते होते त्यामुळे त्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली व अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लग्न समारंभ सोहळा यशस्वी पार पडला होता महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते राजकीय घराणी आहेत होती पण विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नाचा थाट माट पाहुणचार जेवणावळी स्वागत महाराष्ट्रियन पध्दतीचा आगळावेगळा पाहुणचार याची खासियत इतरांहून खूपच वेगळी होती महाराष्ट्रातील एक आमदार शेतकरी आपल्या चिरंजीवाचे लग्न इतक्या जोशात व राजेशाही थाटात तेही लक्ष भोजन देऊन कसे काय करू शकले यांची उत्सुकता व खुमासदार चर्चा बातम्या टिका आरोप झाले पण या सर्वांना सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी त्यांच्या बुध्दी कौशल्याने अंगभूत हुशारीने उत्तर देऊन सर्वांच्या शिडातील हवा काढून त्यांची बोलती बंद केली होती त्यानंतर महाराष्ट्राचे अनेक वर्षे कॅबिनेट मंत्री उपमुख्यमंत्री व अनेक सहकारी संस्थांच्या कार्यकारिणी वर पदाधिकारी राहिलेले विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र व राज्यसभेचे सदस्य राहिलेले व विद्यमान विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांचा अकलूज येथे शाही विवाहसोहळा संपन्न झालेला अनेकांच्या लक्षात राहिला आहे त्यांच्या विवाह सोहळ्याला राज्यातील दिग्गज नेते मंत्रिमंडळातील बहुतांश सर्व मंत्री कार्यकर्ते साहित्यिक विचारवंत कलावंत अनेक सेलेब्रिटी यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा विवाह सोहळा स्मरणात राहिला आहे मोहिते पाटील घराणे व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे त्यांचे सहकारी कार्यकर्ते हे त्यांना सोपवलेली जबाबदारी व काम इत्यंभूत पार पाडण्यात माहिर आहेत त्यामुळे मोहिते पाटील जे ठरवतात जे करतात हे शास्त्रशुद्ध शल्यचिकित्सक वृत्तीने पार पाडतात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे घराण्यातील आता तिसऱ्या पिढीचे म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचे नातू व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव विश्वतेज मोहिते पाटील यांचा शाही विवाहसोहळा येत्या आठ मार्च रोजी अकलूजला विजयसिंह मोहिते क्रिडा संकुल या भव्य स्टेडियमवर संपन्न होणार आहे या विवाह सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण पत्रिका देण्यासाठी स्वतः आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे राज्यातील सर्व मातब्बर नेते कार्यकर्ते मंत्री कलावंत विचारवंत साहित्यिक यांना समक्ष लग्न पत्रिका देत आहेत तर दिल्लीत ही त्यांनी अनेक केंद्रिय मंत्री मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या मुलाचे लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली आहे त्यामुळे अकलूजला मोहिते पाटील यांचे तिसऱ्या पिढीतील लग्न सोहळ्याची सोलापूर जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन उपमुख्यमंत्री अनेक मंत्री तसेच उद्धव ठाकरे राज ठाकरे हे ही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीत अकलूजला या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे मोहिते पाटील यांचे आमंत्रण सर्वांनी स्विकारले आहे विवाह सोहळ्याच्या निमित्ताने अकलूज मध्ये सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते अनेक सेलेब्रिटी यांची मांदियाळी पहायला मिळणार आहे त्यामुळे सध्या माळशिरस तालुक्यात या विवाह सोहळ्याची धामधूम व पत्रिका वाटणे गाठीभेटी निमंत्रण तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामदैवत यांचे मंदिरात निमंत्रण पत्रिका ठेवणं दर्शन व नेते कार्यकर्ते यांना आग्रहाने लग्नाला उपस्थित रहाण्यासाठी मोहिते पाटील परिवारातर्फे विनंती केली जात आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा