Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

*"व्हॅलेंटाईन डे "दिवशी मुलीला जपा!* *व्हॅलेंटाईन द्वारे चुकीचे" पहिले पाऊल "पडण्याआधीच तिला सावरा!...*

 


*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*

  *(पत्रकार) ---सांगली*

  *मो:--8983 587 160

मुलीने लव्ह मॅरेज केले म्हणून तोंड लपवण्यापेक्षा त्या मुलीवर ही वेळ येऊच नये म्हणून पालकांनी कधी प्रयत्न केलेत का?? व्हेलेंटाईन डे हा दिवस "प्रियकर - प्रेयसी" यांच्यासाठी "मुहूर्ताचा" दिवस असतो. त्यामुळे पालकांनी या दिवशी आपल्या मुलीला क्लास - शाळा - कॉलेज ला पाठवू नये असे म्हंटले तर वावगे ठरेल का ???

मुलांचा सहवास आणि आकर्षण यामुळे मुलींच्या इच्छा - आकांक्षा रुंदावतात, त्या "स्वप्नांत" रमणीय होतात हें वास्तव आहे.

जर तरुण मुलींना मोबाईल पासून "परावृत्त" करता आले तर असे "अनुचित" प्रकार रोखता येणे शक्य नाही का ??? 

  *मोबाईल म्हणजे दुधारी तलवार !*

 शाळा - कॉलेज मध्ये मुलींना मोबाईल ची "मुभा" देणे म्हणजे पालकांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे नाही का ???

100 मध्ये 1 मुलगी बाह्यआकर्षणापासून दूर असू शकते मगं पालक जाणीपूर्वक आपल्या मुलीला लव्हमॅरेज अथवा "आंतरजातीय" विवाहाच्या गर्तेत मुलीला का ढकलत आहात ??? 

विविध आमिष दाखवून तरुण मुलींना - तरुणींना आपल्या जाळ्यात ओढतात. पिझा,कॅफे,लंच,गिफ्ट,महागडे मोबाईल ही आमिष असणारी उदाहरणे आहेत. जे घरात "सहज" मिळत नाही ते बाहेर कोणी देत असेल तर मुलगी सहज मुलाच्या जाळ्यात अडकते..फसते. कॉलेजला जातो म्हणून तरुणासोबत लॉजला जाणारे 10-15 कॉलेज जोडपे रस्त्यावर सर्रास दिसतात. आम्हाला जे दिसतय ते पालकांना "दिसतं" नसेल का ??? 

कॉलेज तरुण - तरुणी. सोबत असणाऱ्या MH - 09 पासिंगच्या दुचाकी सांगलीत जास्त दिसतात आणि कोल्हापुरात MH - 10 च्या पासिंगच्या दुचाकी जास्त दिसतात. एक शोधपत्रकार म्हणून मला "जळजळीत वास्तव" दिसतयं म्हणून इतक्या "पोटतिडकीतून" हें सांगतोय हें लक्षात घ्या.

मोबाईल कॉलेज आणि शाळेच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे.परंतु विविध लफडे असणारी टी.व्ही. सिरीयल (मालिका ) आणि अन्य "माहित नसलेल्या" गोष्टी मुलींना समजतात .तात्पर्य मोबाईल हा एक "दुधारी तलवार" आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये. यामध्ये "संस्कारी" चांगल्या सन्माननीय मुली - तरुणी याला "सुखद अपवाद" आहेत त्यांचे खरंचं जाहीर "अभिनंदन" करने संयुक्तिक ठरेल.

 *लडकियोंका इमान बचाओ, वक्त पर शादी करो !* 

आई वडील जर संस्कारी असतील तर मुलींना "सभ्य" वळण लागते.आई -वडील मुलींपासून दूर असतील तरीही मुलगी त्यांना "धोका" देत नाही.परंतु आई वडील लफडेबाज असतील,मुलीवर त्यांचे चांगले "संस्कार" नसतील ,त्यांचे दुर्लक्ष असेल तर ती मुलगी बिघडायला फार वेळ लागत नाही.

त्यामुळेच कॉलेज शिकवण्याच्या नादात मुलगीच "लव्ह मॅरेज" अथवा आंतरजातीय विवाह करून पालकांनाचं एक नवीन धडा देऊन जाते.

"मुस्लिम" धर्मात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मुलगी "वयात" आल्यावर तिचे "लग्न" लावून देण्याची आज्ञा केली आहे. 21 व्या शतकाचे आधुनिक जग पाहता,त्यांचे विचार 100% योग्य आहेत.

असो, मुलींना - तरुणींना बाह्य आकर्षणापासून वाचवा..त्यांना जपा..! 

व्हेलेंटाईनद्वारे चुकीचे पहिले पाऊल पडण्याआधीच तिला सावरा..! 


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा