Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ९ मार्च, २०२५

*६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे 15 व 16 मार्च ला आयोजन*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेव्या मान्यतेने कर्जत येथे २६ मार्च ते ३० मार्च २०२५ या कालावधीत होणाऱ्या ६६ वी वरिष्ठ राज्य अर्जिक्यपद महाराष्ट्र केसरी लढत २०२४-२५ सोलापूर जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त

विद्यमाने,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मा.डॉ. धवलस्सिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील साहेब यांच्या

वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हा निवड चाचणीचे आयोजन शनिवार

दि. १५ मार्च २०२५ ते १६ मार्च २०२५ अकलूज येथील धवल श्रीराम मंदिर, धनश्री नगर, अकलूज ता. माळशिरस

येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पैलवान, वस्ताद व कोच यांनी याची नोंद घेऊन निवड

चाचणी कुस्ती स्पर्थेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. असे सोलापूर जिल्हा तालीम संघाच्या वतीने कळविण्यात

येत आहे.या स्पर्धेचे नियोजन बैठक धवलश्रीराम मंदिर अकलूज येथे संपन्न झाली.



वजन गट वरिष्ठ गादी-माती ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२,९७ व ८६ ते १२५ महाराष्ट्र

केसरी (किलो)


जन्मतारीख - वरीष्ठ गट २०০५ आवश्यक. व २००६ असेल तर मेडीकल व पालकांचे संमत्तीपत्र.


वरीष्ठ गटातील पैलवानांना वजनात १ किलो सूट मिळेल.


वरिष्ठ गट पैलवानांनी सोबत ओरीजनल आधार कार्ड, त्याची झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक आहे.


सदरच्या कुस्ती स्पर्धा सोलापूर जिल्ह्यातील सर्वासाठी खुली असून, कोणतेही बंधन नाही. सर्व गटातील

वजने दि. १५ मार्च २०२५ रोजी स्पर्धा स्थळी सकाळी ८ ते ११ या वेळेत घेतली जातील. वजनाबाबतची व इतर

कोणतीही तक्रार वजनाच्या वेळेतच घेतली जाईल नंतर तक्रार चालणार नाही. सदरच्या कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य

कुस्तीगीर परीषद, पुणे व सोलापूर जिल्हा तालीम संघ, सोलापूर यांचे नियमाप्रमाणे होतील.

तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त पैलवानांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सोलापूर जिल्हा तालीम संघाचे वतीने करण्यात आले या बैठकीस तालीम संघाचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील

उपाध्यक्ष.पै.सर्जेराव चवरे,पै.रावसाहेब (छोटा)मगर,पै.मारूती वाकडे,पै.महादेव भंडारे,पै.महादेव ठवरे ,पै. प्रताप झंजे,पै.वामन उबाळे,पै.भरत मेकाले,पै.विलास कंडरे,पै.अभिमन्यू डमरे,पै भारत भोसले,पै.केदार साखरे,पै.नरसिंह कुलकर्णी,पै.सचिन भोपळे 

पै.ज्ञानदेव पालवे

पै.आण्णासाहेब शिंदे,आण्णासाहेब इनामदार,सुदर्शन मिसाळ ,नवनाथ साठे 

पै.नारायण माने कोच,मयुर माने,संग्राम भोसले,मोहन नगरे उपस्थित होते.

 

  पै.ज्ञानदेव पालवे व नारायण माने कोच या़चेसह सोलापूर जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा