Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ९ मार्च, २०२५

*कोथरूड पुणे येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा*

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

शनिवार दिनांक 8/03/25 रोजी श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालय कोथरुड पुणे.येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कायर्यक्रमाची सुरवात राजमाता जिजाऊ , सावित्रीबाई फुले, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील, इंदिरा गांधी यांच्या प्रतीमा पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्य गुरू सौ.अनुया मंदार जोशी व योग गुरु सौ.ज्योती वाघचौरे तसेच कोविड योध्दा सौ.छाया सिरसट यांचे सन्मान करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयत विविध उपक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन केले जाते.त्यापैकी विज्ञान प्रदर्शन, चित्रकला परीक्षा व प्रताप क्रिडा मंडळ नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाण पत्र वाटप करण्यात आले. सन 2023-24 व सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात दररोज न विसरता मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी डेटॉल हॅंन्ड वाॅश देण्याची जबाबदारी पार पाडणारी इयत्ता 9 वी मधील विद्यार्थीनी कु.वैभवी सगर हिला विद्यालयाच्या वतीने *आरोग्य मैत्रिणी पुरस्कार* देवून गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मा.मुख्याध्यापिका कु.जयश्री जावळे यांनी केले.महिला दिनाच्या निमित्ताने विद्यार्थींनी कु.निकीता जाधव व कु.करीश्मा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या पाहुण्या सौ.ज्योती वाघचौरे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.अनुया जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सुत्रसंचलनाची जबाबदारी सहशिक्षक श्री.करोटे सर यांनी पार पाडली.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहशिक्षक श्री.अस्लमखान पठाण सर,श्री आदित्य खंडागळे सर,श्री.रमेश चौधरी सर व सेवक श्री.विजय बाविसकर,श्री.निळकंठ यांनी मेहनत घेतली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा