उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
महिलांचे सशक्तीकरण, सृजनशीलता आणि आनंदाचा उत्सव याचा मिलाफ म्हणजेच प्राथमिक शाळा क्र. 3 माळीनगर येथे साजरा झालेला जागतिक महिला दिन या विशेष दिनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. सौ.अर्चना पांढरे , संस्थेच्या खजिनदार ज्योतीताई लांडगे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित महिलांचा सत्कार या सोहळ्यात करण्यात आला.
समाजात वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला यामध्ये डॉ. हाके . फिनिक्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख. आदर्श शिक्षिका व खेळाडू रूपाली आसबे-भोसले, तसेच सौ शितल बोरावके यांचा समावेश होता.
कार्यक्रमा च्या अध्यक्षा सौ अर्चना पांढरे यांनी महिलांनी स्वतःला कणखर बनवले पाहिजे असे प्रतिपादन केले , कवीयत्री नूरजहाँ शेख यांनी आपल्या कवितेतून समस्त स्त्री वर्गासाठी प्रेरणादायी विचार मांडले. डॉ. हाके मॅडम यांनी महिलांच्या आरोग्यासाठी स्वसंरक्षण आणि जीवनशैली यावर मार्गदर्शन केले. सौ .शितल बोरावके यांनी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण याविषयी प्रेरणादायी विचार मांडले.सौ रूपाली आसबे-भोसले यांनी महिलांनी आपले छंद जोपासून त्यातून प्रगती साधावी असा संदेश दिला.व व विद्यार्थिनी ईश्वरी अनपट हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ललिता नागटिळक मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती वंदना बंडगर मॅडम यांनी उत्साहात पार पाडले, तर आभार प्रदर्शन सौ स्मिता म्हेत्रे यांनी केले.
महिला दिनानिमित्त पाककला लिंबू-चमचा शर्यत आणि रांगोळी स्पर्धांचे विजेत्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सहभागी महिलांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर आनंदमय झाला. या सोहळ्याने महिलांच्या कल्पकतेला आणि आत्मविश्वासाला बळ दिले.
संघर्षातून स्त्री शक्तीकडे... या भावनेने प्रेरित होत,अतिशय उत्साहात महिलादिन पार पडला.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडन्यासाठी श्री.खरात सर,श्री.भोसले सर,श्री.काळे सर,सौ.शिंदे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा