Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १ मार्च, २०२५

*म्हणे ....ओरडलीच नाही--- स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बस मध्ये झालेल्या बलात्कार संदर्भात गृहराज्य मंत्र्यांच्या संवेदनशील वक्तव्यावरून संतापाची लाट...*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

स्वारगेट पूणे बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात तीन दिवसांनंतरही पोलिसांना यश आले खरे परंतु राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आरडाओरडा केला नाही म्हणून बलात्कार झाला, असे बेजबाबदार वक्तव्य केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


गृहराज्यमंत्री कदम यांनी गुरुवारी येथे माध्यमांशी बोलताना पोलिसांची अकार्यक्षमता लपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या घटनेला डेपो मॅनेजर जबाबदार असल्याचे ठासून सांगितले. वर कहर म्हणजे ते म्हणाले की, "विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेशी काहीतरी गोड बोलतो. काहीतरी दीड-दोन, चार मिनिटांमध्ये ब्रेन वॉशिंग करतो. त्यानंतर घडलेल्या घटनेची आपल्याला माहिती आहे. परंतु, अशावेळी तिथे कोणतीही हाणामारी, तिथे कोणतंही आर्ग्युमेंट, कुठलंही फोर्स, असं काही घडलेलं नाही. जे काही घडलंय ते अतिशय शांतपणे झालेलं आहे. तिथे आरडाओरडा सुरू आहे, हाणामारी झालेली आहे, असं काहीच घडलेलं नाही. त्यामुळे आसपास असलेल्या सर्वसामान्यांनादेखील ते कळलं नाही. ज्यावेळी आरोपी आपल्या ताब्यात येईल, तेव्हाच आपल्याला माहिती मिळेल." 


विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कदम यांचे हे वक्तव्य समस्त महिलांचा अपमान करणारे असून त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, असे म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा