*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
सोलापूर येथील ज्येष्ठ पत्रकार शहाजहान अत्तार यांना दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार शहाजहान अत्तार हे मूळचे माळशिरस येथील रहिवासी असून त्यांनी सन १९८१ पासून पत्रकारतेची सुरुवात केली.त्यांनी सोलापूर येथील विविध दैनिकांचे तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले आहे.
या कामासोबत त्यांनी सन २००४ साली इलेक्ट्रॉनिक मिडियाकडे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले. यावेळी त्यांनी इतरही न्यूज चॅनलचे काम करून सामाजिक व राजकीय परिसरात आपले कामाचा ठसा उमटवला आहे.
अकलूज व सोलापूर येथील पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचा खा.शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला होता.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दिल्ली येथील ग्लोबल फाउंडेशन (भारत सरकार) संलग्न यांनी घेऊन त्यांना आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांच्या शुभहस्ते व राष्ट्रीय महिला आयोग विजया रहाटकर याचे उपस्थित हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी मनीष गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा