*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
आज मंगळवार दि.४ मार्च २०२५ रोजी समस्त बौध्द बांधवांच्या वतीने इंदापूर चे तहसीलदार व इंदापूर चे पोलीस निरीक्षक यांना बोधगया येथील महाबोधी विहार (ब्राह्मण प्रशासनाच्या विरोधातील)मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात... आंदोलनाचे निवेदन देण्यात आले..
या निवेदनात म्हटले आहे की, महाबोधी विहार हे एक जागतिक बौद्ध विहार, ऐतिहासिक स्मारक आणि पर्यटन स्थळ आहे. बौध्दांची पवित्र वास्तु आहे. असे असताना येथे ब्राह्मण प्रशासनाने कब्जा केला आहे त्यामुळे याच्या विरोधात बोधगया येथे बौद्ध भिक्खूंचे आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाला संपूर्ण भारतातुन व जगभरातुन पाठींबा मिळत आहे. आम्हीसुद्धा बोधगया येथे चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत असुन त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आम्ही बौद्ध बांधव सोमवार दि. १७ मार्च २०२५ रोजी इंदापुरमध्ये आंदोलन करीत आहोत.
आमच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे...
१. बिहार सरकारचा बोधगया महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा (१९४९) रद्द करा.
2. महाबोधी ट्रस्ट ही संपूर्णत: बौद्धांच्या ताब्यात दयावी.
3. ब्राह्मण प्रशासन हटवा.
आमच्या आंदोलनाची रूपरेषा -
* सकाळी १० वाजता नगरपरिषदेच्या समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शांतता मार्च (शांतता रॅली) निघेल.
* तहसील कचेरी समोर शांतता रॅली येऊन धरणे आंदोलन सुरू होईल.
तरी कृपया शासन व प्रशासनाने दखल घेऊन आमचा आवाज , मागण्या देशाच्या राष्ट्रपतींकडे, पंतप्रधानांकडे पोहचवाव्यात ही नम्र विनंती.
अशाप्रकारे निवेदन देऊन बौद्ध बांधवांनी बोधगया येथील महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचे शांततेच्या मार्गाने रणशिंग फुंकले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा