Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १ मार्च, २०२५

*बालवयातचं लहान मुलांमध्ये विज्ञानाचे संस्कार रुजले पाहिजेत --डॉ.प्रविण ढवळे*

 


*अकलूज--- प्रतिनिधी*

 *शकूरभाई तांबोळी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा झाला.बालवयापासूनच लहान मुलांमध्ये विज्ञानाचे संस्कार रुजले पाहिजेत व त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा असे मत स.म.शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च चे प्राचार्य डॉ प्रविण ढवळे यांनी या कार्यक्रमावेळी व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

            विद्यालयाच्या अटल टिकरिंग लॅबच्या प्रमुख धनश्री माने व राजेंद्र जाधव आणि त्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटद्वारे प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले.स्टेजवरील उपस्थित सर्वांनी प्रतिमा पूजन करून थोर शास्त्रज्ञांना अभिवादन केले.

            सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.रुपाली नवले,कल्पना जाधव,विजया खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी थोर शास्त्रज्ञांची वेशभूषा करून त्यांनी लावलेल्या शोधांविषयी माहिती सांगितली.विज्ञान दिनाचे औचित्य साधून दिपाली लोखंडे,योगिता सोनार,सविता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

       यावेळी विद्यालयातील विज्ञान विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थी ज्ञानराज पवार याचे भाषण झाले.विद्यालयातील विज्ञान शिक्षक संदिप शिंदे यांनी विज्ञान दिनाचे महत्व सांगितले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक अमोल फुले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

        हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजश्री पवार,भक्ती तावरे,शितल कथले,कोमल पवार,श्रीश देऊसकर यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक धनंजय मगर यांनी केले.सूत्रसंचालन यास्मिन शेख यांनी केले तर दत्तात्रय घंटे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा