पाहण्या कोर चंद्राची
उत्सुकता लहान थोरांची
चाहूल सुखद ही हर्षाची
रमजानच्या आगमनाची ll
धडपड पुण्य कमविण्याची
पापवृत्ती व्यसनाना नसे थारा
ताबा मनावर ठेवावा शिकवण देई रमजान त्याग करण्याची l l
गरीब श्रीमंत भेद नसे
जकात फित्रा सदका
विधवा अनाथांनाआपुलकी
पवित्र रमजान देत असे ll
सुंगंध अत्तराचा घरोघरी
शिरखुर्मा गुलगूल्यांचा आस्वाद घ्याया बंधुत्व दिसे चोहीकडे
विविधतेतून एकतेचे दर्शन दारोदारी l l
नूरजहाँ फ्कृद्दिन शेख
गणेशगाव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा