Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २ मार्च, २०२५

लवंग तालुका माळशिरस येथे ॲग्रीस्टॅक शिबिराचे आयोजन

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

अकलूज प्रांताधिकारी विजया पांगारकर मॅडम, तहसीलदार सुरेश शेजुळ साहेब यांच्या सूचनेनुसार लवंग येथे ॲग्रीस्टॅक शिबिराचे आयोजन करण्यात आले, लवंग गावचे ग्रामदैवत श्री हनुमानाच्या मूर्तीचे पूजन श्री. राजेंद्र थोरात व लोकनियुक्त सरपंच श्री. प्रशांत विजयकुमार पाटील यांच्या शुभहस्ते करून या शिबिराची सुरुवात करण्यात आली. ॲग्रीस्टॅक योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्याला त्यांचे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक जोडला जाणार आहे, शेतकऱ्यांना कृषीविषयक सर्व प्रकारचे शासकीय अनुदान व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत आपले फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे. या शिबिरात ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची ई केवायसी केलेली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांची ई केवायसी व शेती विषयक मार्गदर्शन अकलूज मंडळ कृषी अधिकारी कचरे साहेब, कृषी पर्यवेक्षक जाधव साहेब, कृषी सहाय्यक कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी लवंग गावातील सर्व क्षेत्रातील सर्व पदाधिकारी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरात लवंग पंचक्रोशीतील 81 शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली. अद्याप ज्या शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली नसेल, अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या महा ई सेवा व आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन लवंग ग्राममहसूल अधिकारी सुषमा निकम मॅडम यांनी केले. तसेच या शिबिराचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लवंग महसूल सेवक बाळासाहेब सरवदे यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा