कवियत्री - नूरजहाँ शेख
गणेशगाव , ता.माळशिरस
शहीदांनो*
बघताय ना तुम्ही स्वर्गातून देशात तुमच्या काय चाललंय ते?
देशप्रेम तुमच्या श्वासात होतं मिसळलेलं
तुमच्या रक्तात होतं भिनलेलं
तुमच्या हृदयात होतं कोरलेलं
म्हणूनच तर तुम्ही श्वासात श्वास असेपर्यंत देशासाठी लढलात
हसत हसत फासावरही चढलात
या डौलाने फडकरणाऱ्या तिरंग्यासाठी.
पण आम्ही काय करतोय देशासाठी ?
सीमेवरती जवान रोज मृत्यूशी झुंज देतायत रक्ताची होळी खेळून कुर्बान होतायत
आम्ही फक्त स्वतःसाठीच जगतोय
विचार, कार्य तुमचे विसरतोय
म्हणून हे शहीदांनो पुन्हा जन्म घ्या
आणि शिकवा मरगळलेल्या मनाला देशप्रेम ,
सळसळु दे रक्त, जागी होऊ दे देशभक्ती देशाच्या शत्रुला नेस्तनाबूत करण्यासाठी येऊ दे आमच्यात ही शक्ती.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा