*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे या महिन्याच्या औचित्य साधून गोरगरीब मुस्लिम बांधवांना रमजान ईद साजरी करता यावी या उद्देशाने "फतेह मोहम्मद फाउंडेशन" यांचे वतीने अकलूज, सराटी ,वाघोली, लक्ष्मी दहिवडी, मांडवे ,माळशिरस, तांबवे, वेळापूर, माळीनगर ,गणेशगाव पंढरपूर, इत्यादी २४ गावांमध्ये शीरकुर्मा साहित्य असणारे १३५ गरजू समाज बांधवांना ईद चे किट वाटप करण्यात आले.
समाजात जे सधन बांधव आहेत त्यांनी गरीब गरजू बांधवांना
रमजान महिन्यांत जकात देणे अनिवार्य आहे. आपल्याबरोबर आपल्या शेजारी असणाऱ्या शेजाऱ्यांची ही ईद साजरी व्हावी तो ईद पासून वंचित राहू नये आणि त्यांच्याही जीवनात प्रकाशाचे किरण अवतरावे या उद्देशाने हजारो वर्षापासून ही परंपरा जपली जाते. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी या दिलेल्या शिकवणीनुसार गरजू अनाथ कष्टकरी या वर्गाच्या जीवनात आनंद यावा यासाठी हा उपक्रम राबवला जातो याचेच औचित्य साधून फतेह मोहम्मद फाउंडेशन या संस्थेकडून प्रतिवर्षीप्रमाणे शिरकुर्मा व ईद चे साहित्य असणारे १३५ किट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अब्बूबक्कर शेख सर, उपाध्यक्ष मोहम्मद रफीक मुल्ला, सचिव जिब्राइल नदाफ, संग्राम नगरचे माजी सरपंच कमाल रहमान शेख यांचे हस्ते या किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी इस्माईल मुजावर, महमूद काजी, शमशूद्दीन मुलानी, मौलाना अब्दुलगनी शेख, बंडू शेख, बशीर मुलानी, संजयकुमार कांबळे, भास्कर काळे, आलम शेख, असलम सय्यद, इरफान बागवान, रुबाब मौलाना, आदी मान्यवर उपस्थित होते.
*प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार गरजू लोकांची मदत व्हावी व ईद साजरी करता यावी म्हणून हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे*
- *प्रा.अब्बूबक्कर शेख, अध्यक्ष, फतेह मोहम्मद फाउंडेशन*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा