*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात मागील चाळीस वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यल्प शुल्कात उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. परंतु, आता मंदिर संस्थान व्यवस्थापन हे अभियांत्रिकी महाविद्यालय बंद करून तेथे कौशल्य विकास विद्यापीठ चालू करण्याचा घाट घालत आह. याला आमचा विरोध असून येथे कॉलेजच ठेवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडीने निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.
तुळजापूर सारख्या ग्रामीण भागात कौशल्य विकास विद्यापीठ
चालू शकत नाही. परंतु, कांही लोक राजकीय स्वार्थासाठी येथे कौशल्य विकास विद्यापीठ चालू करून राजकीय पोळी भाजत आहेत. हे महाविद्यालय शासनास हस्तांतरण करण्याचा ठराव झाला असताना येथे वेगळेच घडत आहे. हा प्रकार तत्काळ थांबवून आई तुळजाभवानीच्या नावाने चालू
असलेल्या महाविद्यालयास शासनाकडे हस्तांतरित करावे, त्यासाठी आम्ही आपणास सहकार्य करू. परंतु आम्ही हे महाविद्यालय बंद होऊ देणार नाही, एक चालू महाविद्यालय बंद करून नवीन विद्यापीठ चालू करणे योग्य वाटत नाही. आपण इतर ठिकाणी कौशल्य विकास
विद्यापीठ चालू करू शकता, याचा विचार करावा अन्यथा तुळजापूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने या विरोधात तुळजापूर शहर व तालुक्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी अॅड. धीरज पाटील, श्याम पवार, उत्तम अमृतराव, अनिल शिंदे, अमोल कुतवळ, अनमोल साळुंखे, राहुल खपले, शरद जगदाळे, सुधीर कदम, चंद्रकांत सोनवणे, बाळासाहेब केसरकर, संदीप कदम, तोफिक शेख, संतोष मकरंद बामनकर, धनराज शिंदे, नवनाथ जगताप, गोविंद देवकर, संदेश माने यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा