Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ९ मार्च, २०२५

*माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय "जागतिक महिला दिन "साजरा*

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी सावित्री महिला गृहउद्योग संस्था,महिला मंडळ माळीनगर येथील साधना रासकर,लीना गिरमे,जयश्री झगडे,सारंगा गिरमे,राजश्री जगताप,कविता पांढरे,संगीता जाधव,नीलम पांढरे,वंदना भरवीरकर, हेमलता खताळ तसेच प्रशालेतील शिक्षिका सविता पांढरे,सविता पोटे,उमा महामुनी,वैशाली पांढरे,किशोरी चवरे,रजनी चौरे, रूपाली नवले,आशा रानमाळ,मनीषा नलवडे,सुप्रिया झगडे,निशा दळवी,सुखदा विधाते,मेघा जोशी,वैशाली बनकर,शितल शिंदे,कांताबाई सर्जेराव, अफसाना शेख या सर्व महिलांना प्रशालेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते व्यासपीठापर्यंत फुलांची उधळण करत सुसज्य रांगोळी बाजूला काढून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.सर्व महिलांच्या हस्ते



त्यानंतर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. 

      सर्व महिलांचा शाल व गुलाब पुष्प देऊन प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला.

    यावेळी विद्यार्थिनी स्वामिनी थोरात,सृष्टी बनकर, जानवी दाढे,सिद्धी हेगडकर,पंकजा धायगुडे यांची भाषणे झाली.शिक्षिका सविता पांढरे जगन्नाथ कोळी,विद्यार्थिनी वैष्णवी नेवसे यांनी महिला दिनावर कविता सादर केली.साधना रासकर,सारंगा गिरमे,राजश्री जगताप यांनी विचार व्यक्त केले. 

      विद्यार्थीनी कोमल चोरमले व देविका दौंडे या मुलींना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. प्रशालेचे प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार, उपप्राचार्य रितेश पांढरे,पर्यवेक्षक कल्याण कापरे,माजी विद्यार्थिनी लता सावजी व सुशीला सावजी व सर्व शिक्षक व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या शेवटी शिव्या मुक्त समाज अभियानाची प्रतिज्ञा घेऊन समारोप करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय बांदल यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा