*नातेपुते----प्रतिनिधी*
*श्रीकांत बाविस्कर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये दोन दिवस चाललेल्या सिनेट (अधिसभा) मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये प्रथमच कुलगुरूंच्या भाषणापूर्वी स्थगन प्रस्ताव घेण्यात आले. या स्थगन प्रस्तावामध्ये विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात आलेल्या जीवनसाधना गौरव पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावावरून वाद झाला. तसेच कार्यक्रम व्यवस्थित पार न पडल्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनावर टीका करण्यात आली. त्यात व्यवस्थापन परिषद सदस्यांवर झालेल्या टीकेमुळे सभागृहाचे वातावरण तापले. सर्व व्यवस्थापन सदस्यांवर सरसकट टीका करू नये, असे मत काही सदस्यांनी व्यक्त केले.
सभागृहात चर्चा सुरू असताना सभागृहात तापलेले वातावरण पाहून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आधिसभेचे कामकाज काही कालावधीसाठी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली व भोजन झाल्यानंतर ४.०० वा.त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास होऊन व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर यांनी अर्थसंकल्प मांडला त्यानंतर त्यावर चर्चा झाली त्यामध्ये सिनेट सदस्य अपूर्व हिरे यांनी चर्चा घडवून आणली स्थगनप्रस्ताव प्रश्न ठराव यावर चर्चा होऊन प्रसंगी घमासान चर्चा होऊन अर्थ संकल्प मंजूर करण्यात आला या सभेमध्ये सिनेट सदस्य डॉ.सुनील लोखंडे यांनी प्राध्यापकांचे अनेक प्रश्न मांडले त्यामध्ये प्राध्यापकांच्या प्रमोशनचा प्रश्न, वेगवेगळ्या गठीत केलेल्या समित्या तसेच विद्यापीठाकडून महाविद्यालयासाठी आर्थिक तरतूद याविषयी प्रश्न मांडून अर्थसंकल्पामध्ये कपात सूचना मांडल्या तसेच या सभेमध्ये सर्वच सभासदांनी भाग घेऊन आपली मते मांडून आपल्या विद्यापीठाचा नावलौकिक कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करीत आहोत असे सांगितले तेंव्हा मा. कुलगुरू यांनी सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच आपल्याला पुढे जायचे आहे व विद्यापीठाला पुढे न्यायचे आहे असे सांगितले व शेवटी दोन दिवस चाललेली सभा संपन्न झाली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा