*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
२०२४ ला महसूल विभागच राज्यात लाचखोरीत अव्वल होता. यावर्षीही त्यांची त्याच दिशेने घौडदौड सुरु आहे. बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाखाची लाच स्वीकारताना मंडलाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पुणे लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. ४) पुण्यातील चिंचवड येथील मंडलाधिकारी कार्यालय येथे ही कारवाई केली. सुरेंद्र साहेबराव जाधव (वय ५६) असे रंगेहात पकडलेल्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. वाल्हेकरवाडी येथील ५३ वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराने वाल्हेकरवाडी येथे सहा गुंठे जागा घेऊन बंगल्याचे बांधकाम केले होते.
या बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ४ लाख ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी चिंचवड मंडलाधिकारी कार्यालय येथे सापळा लावला. मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी लाचेचे चार लाख रुपये स्वीकारले. लाचेची ही रक्कम जाधव यांनी पार्किंग मधील कारमध्ये ठेवत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. गाडीमधून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.
या घटनेतील तक्रारदारांनी वाल्हेकरवाडी येथे सहा गुंठे जागा घेऊन त्यात बंगला बांधला होता. त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याकरिता जाधव यांनी पाच लाख रुपये मागितले. नंतर साडेचार लाखावर तडजोड केली. त्यातील चार लाखांचा पहिला हफ्ता घेताना त्यांना त्यांच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये पकडण्यात आले.
दरम्यान, लाच घेतल्यानंतर त्यांनी ती आपल्या ह्युंदाई क्रेटा (एमएच-१४-जेक्यू- ८२८२) या कारमध्ये ठेवली होती. तेथून ती एसीबीच्या पथकाने हस्तगत केली. पिंपरी पोलिस ठाण्यात जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधिक्षक डॉ.शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुणे एसीबीच्या पोलिस उपअधिक्षक (डीवायएसपी) भारती मोरे पुढील तपास करीत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा