Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ६ मार्च, २०२५

महिला दिनानिमित्त तांबवे ता.माळशिरस येथे महिला मेळावा उत्साहात .

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

माळशिरस तालुक्यातील तांबवे येथे महिला आर्थिक विकास महामंडळाचा महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला .नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र यशवंतनगर यांच्या वतीने तांबवे येथील महिलांच्या उपस्थितीत पार पडला . या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड सुमित सावंत यांनी महिलांचे हक्क व स्त्री पुरुष समानता या विषयावर मार्गदर्शन केले , फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष नूरजहाँ शेख यांनी आपले विचार व्यक्त करताना पोरी सांभाळ ग ,महिलादिन या विषयावर बहारदार कविता सादर केल्या .महिला उद्योग विकास प्रकल्प व्यवस्थापक सौ.पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांविषयी महिलांना माहिती दिली , या प्रसंगी डॉ विनया हके यांनी आरोग्य विषयक सतर्क राहण्याचा सल्ला महिलांना दिला .या प्रसंगी महिला उद्योजिका शहनाज शेख ,lDC आकाश लोंढे Vo महेश मदने कार्यकारिणी सदस्य सीता सरवदे,मनीषा नवगिरे ,वंदना कांबळे क्षेत्र समन्वयक वैशाली शिंदे,रिजवाना शेख,CRP, मोना नवगीरे ,पूजा क्षीरसागर ,गौरी मने देशमुख ,दिपाली सावंत ,वैशाली बळवंतकर , व तांबवे गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या . पाककला ,संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. उत्कृष्ट गुण मिळवलेल्या महिलांना बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अश्विनी गिरमे यांनी केले .

आभार मोना नवगिरे यांनी व्यक्त केले .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा