Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ७ मार्च, २०२५

महिला आर्थिक विकास महामंडळाचा ५० वा वर्धापन दिन महाळुंग येथे उत्साहात संपन्न .

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

दिनांक 6/3/2025 रोजी जिल्हा समन्वय अधिकारी मा. श्री. सोमनाथ लांमगुंडे यांच्या मार्गदर्शना खाली अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र महाळुंग या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळाचा 50 वर्धपान दिन (सुवर्ण महोत्सवी वर्ष ) साजरा करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी 

तालुका कार्यक्रम व्यवस्थापक मा. श्री. रणजीत शेंडे सर बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा कृषी व्यवस्थापक मा. श्री ओंकार माने विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखाव्यवस्थापक श्री. सागर कदम व रामचंद्र बनकर CMRC अध्यक्षा सौ.जयश्री बाबर व सहसचिव स्वाती बनसोडे उपस्थितीत होते   




कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली. क्षेत्र समन्वक सारिका माने यांनी प्रस्ताविक केले. सीआरपी गायकवाड ,कांबळे , परब अध्यक्ष जयश्री बाबर सहसचिव बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाखा व्यवस्थापक ओंकार माने , सागर गायकवाड तसेच रणजीत शेंडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या विशेष सत्कार किरण नवगिरे ( क्रिकेट पटू) यांची आई लताबाई नवगिरे यांचा सन्मान करण्यात आला ,त्यानंतर जेवणाचा आस्वाद घेऊन विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये ,फुगे फुगवणे , संगीत खुर्ची, इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या महिलांनी सामूहिक व वैयक्तिक डान्स करून कार्यक्रमाची सांगता केली. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका माने यांनी केले .तर आभार शीतल लवटे यांनी व्यक्त केले .

या प्रसंगी CMRC ,लेखापाल लखन साठे , vo लेखापाल अमोल भोसले एलडीसी, संतोष जावीर 

सहयोगीनी मनिषा जाधव, रेश्मा मगर विविध ग्रामसंघाच्या कार्यकारणी व, सीआरपी व महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा