*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान अंतर्गत उमंग लोकसंचलित साधन केंद्र बोरगावच्या बोंडले येथील कार्यालयात ५० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व दिप प्रज्वलन करून झाली.त्यानंतर व्यवस्थापक शिवाजी शेंडगे सर यांनी प्रस्ताविक केले.त्याच्या नंतर काही सीआरपी तसेच कार्यकारणी,सहयोगीनी यांनी आपले मनोगत व कामाचे अनुभव कथन केले.बोंडले गावचे सरपंच विजयसिंह माने देशमुख यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.यावेळी उमंग लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा शाबिरा राजेखान पठाण,सचिव वैशाली ज्ञानेश्वर बिले,व्यवस्थापक शिवाजी अर्जुन शेंडगे,पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर जाधव साहेब, जिल्हा परिषद शिक्षिका धोत्रे मॅडम तसेच लेखापाल,एलडीसी, सहयोगीनी विविध ग्राम संघाच्या कार्यकारणी, सीआरपी व महिला उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा