*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सक्षणा सलगर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवती आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. यापूर्वी सक्षणा सलगर राज्यात युवती प्रदेशाध्यक्षपदाची यांच्याकडे आघाडीच्या जबाबदारी होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पक्षात युवक आघाडीच्या अध्यक्षपदी फहाद अहमद यांची निवड करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीपर्यंत सोनिया दुहान यवती आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी होत्या. मात्र, शरद पवार गटाची साथ सोडत त्या काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यानंतर शरद पवार गटात युवती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त होते. काही महिन्यांच्या कालावधीनंतर या पदावर सक्षणा सलगर
यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सक्षणा सलगर म्हणाल्या की, या
जबाबदारीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभार व्यक्त करते. आधी राज्यात पार पाडत असलेली जबाबदारी राष्ट्रीयस्तरावरही निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडेन. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर उत्तम वक्त्या आहेत. मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील असलेल्या सक्षणा सलगर यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे. लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारसभांसाठी राज्य पिंजून काढले होते. त्यापूर्वीही पक्ष संघटना आणि विविध निमित्ताने महाराष्ट्र पिंजून काढला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा