*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
भारतीय राज्यघटना देशाचा प्रमुख दस्ताऐवज असून त्यानुसार प्राप्त झालेले अधिकार लोकांना कळावे याची माहिती व्हावी तसेच सर्वसामान्य माणसांना कायद्याची माहिती व्हावी व कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी व जनजागृती होणे आवश्यक आहे यासाठी कोल्हापूर जिल्हा विधीसेवा प्राधिकरण तर्फे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन केले जाते. असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस.एस.इंगळे यांनी केले.
ते गोकुळ शिरगांव (ता.करवीर) येथील सौ आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शनाचे शिबिर आयोजित केले होते.यावेळी ते बोलत होते.यावेळी ॲड.विजयकुमार ताटे-देशमुख,ॲड.विजयकुमार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांना स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली,सरस्वतीच्या फोटोचे पूजनाने झाली.यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.एस.इंगळे कायदेविषयक जनजागृती विषयी मार्गदर्शन करताना मनोधैय योजना आणि पीडितासाठी भरपाई योजना याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या विषयी महिलांच्या विषयी कायद्यांच्या बद्दल जनजागृती पर मार्गदर्शन केले.
यावेळी ॲड.विजयकुमार ताटे-देशमुख यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायदा याविषयी माहिती दिली.दरम्यान संस्थापक प्राचार्य के.डी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी प्राचार्य तेजस पाटील, मुख्याध्यापिका एस.के.पाटील, आदीसह विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.के.पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन उपप्राचार्य निर्मला केसरकर यांनी केले.आभार,ॲड.विजयकुमार कदम यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा