*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी राजे शिंदे महिला आघाडी जिल्हा प्रमुख आशाताई टोणपे यांच्या उपस्थितीत युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत यांच्या वतीने महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात २५/४ लवंग येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
वाघोली या गावामध्ये रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत रोज रात्री लाईट बंद असते.सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. उष्णतेची तीव्रता भयंकर वाढली आहे.रात्रभर लाईट नसल्यामुळे शेतकऱ्यांना घरामध्ये झोपणे ही अशक्य झाले आहे.उष्णतेमुळे शेतकरी वर्ग घरामध्ये झोपू शकत नाही आणी या उष्णतेमुळे शेतकऱ्यांना सर्प दंश होऊ शकतो याची भीती शेतकरी वर्गामध्ये पसरलेली आहे.त्यामुळे रात्रीची बंद असणारी लाईट तात्काळ चालू करण्याची मागणी शिवसेना युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
गेली २० ते ३० वर्ष झाले माळीनगर,सवतगाव,बिजवडी,तांबवे,गणेशगांव,लवंग,वाघोली वाफेगांव,बाभुळगाव,संगम या गावातील लाईटच्या तारा बदललेल्या नाहीत.त्यामुळे सद्याच्या स्थितीला तारा खूप जीर्ण झाल्यामुळे लाईटच्या तारा तुटण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे लाईटचा सतत लपंडाव चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे लाईटच्या तारा त्वरित नवीन बसवून देण्यात यावेत ही मागणी शिवसेना युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिली जाणारी लाईट ही ८ तास दिली जाते परंतु लाईटच्या सततच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांना ८ तास लाईट मिळत नाही.ज्या वेळी लाईटचा घोटाळा होतो ते घोटाळ्याचे तास वजा करून रुटिंग नुसार शेतकऱ्यांना लाईट ८ तास देण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली.गणेशगांव आणी जांभुळबेट या गावातील लाईटच्या सततच्या घोटाळ्याचा कायमस्वरूपी मार्ग काढावा या विविध मागण्यासाठी शिवसेना युवा सेनेच्या वतीने पंचवीस चार लवंग येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी महादेव बंडगर,दत्ताभाऊ साळुंखे,अनिल बंदपट्टे,अरुण मदने,दत्ता काशीद,पिंटू तात्या चव्हाण, अशोक देशमुख,लवंगचे सरपंच प्रशांत पाटील,पिंटू चव्हाण, शिवराज पाटील,प्रदीप पाटील, प्रशांत भिलारे,वाघोलीचे सरपंच अमोल मिसाळ,बळीराम मिसाळ,पंडित मिसाळ,रघुनाथ मिसाळ,सुदर्शन मिसाळ,सचिन पाटोळे,नवनाथ चव्हाण,गणेश मिसाळ,विकास चव्हाण,अवधूत मिसाळ,सचिन मिसाळ,गणेश यादव,माऊली मदने,जयवंत सोलनकर,नशीरभैय शेख,सचिन यादव,हर्षद मदने,सोनु मदने, सरपंच सदातात्या शेंडगे उपस्थित होते.
*चौकट*
*महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल काढलेले अनुऊदगार बद्दल त्यांची कृषी मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी.अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी राजे शिंदे यांनी केली.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा