Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ७ एप्रिल, २०२५

*शिवरत्नच्या विराज गोडसेची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड.*

 


उपसंपादक- नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

अकलूजच्या शिवरत्न शिक्षण संस्था,अकलूज संचलित शिवरत्न स्कूल,शंकरनगर- अकलूज आणि शिवरत्न बास्केटबॉल अकॅडमीचा खेळाडू कु.विराज विकास गोडसे याची भारतीय बास्केटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित पाँडिचेरी येथे होणाऱ्या ४० व्या १६ वर्षांखालील राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.

       दि.२९ मार्च २०२५ रोजी पुणे येथे भारतीय बास्केटबॉल संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल निवड चाचणीत सोलापूर शहर व जिल्हा ॲम्युचर बास्केटबॉल संघटनेचे वतीने सहभागी झाला होता.१५० खेळाडूंपैकी केवळ १५ खेळाडूंना अंतिम सराव शिबिरासाठी निवडण्यात आले आणि या सराव शिबिरातून विराजने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघात स्थान पटकावले.

            विराजच्या या यशाबद्दल सोलापूर शहर व जिल्हा ॲम्युचर बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष खासदार धैर्यशिल मोहिते- पाटील,शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ.शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील,संस्थेचे सर्व संचालक मंडळ,शिवरत्न बास्केटबॉल अकॅडमीचे प्रमुख अनिल जाधव सर,तसेच शाळेचे प्राचार्य,समन्वयक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अकॅडमीतील सर्व सहकारी खेळाडूंनी हार्दिक अभिनंदन करून त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा