Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २८ एप्रिल, २०२५

*सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर कल्याणशेट्टी -माने- हसापूरे यांचे वर्चस्व ---ग्रामपंचायत मध्ये सुभाष बापूंनी ताणले!...*

 


*सोलापूर ---प्रतिनिधी*

*आंबिद. बागवान*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी

कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांचीच सोलापूर बाजार समितीवर मालकी ; ग्रामपंचायत मध्ये मात्र बापूंनी ताणले !

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांच्याच पॅनलचे वर्चस्व राहिले. बाजार समितीच्या 18 संचालकापैकी तब्बल 15 जागा जिंकण्यात कल्याणशेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला यश आले तर आमदार सुभाष देशमुख यांनी उभे केलेल्या परिवर्तन पॅनल कडे ग्रामपंचायत च्या तीन जागा गेल्या. ग्रामपंचायत मध्ये मात्र आमदार बापू यांनी विरोधकांना चांगलेच ताणवल्याचे पाहायला मिळाले. मात्र या विजयाचे खरे किंगमेकर माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे हेच ठरल्याचे दिसून येते.


आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनल मध्ये दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे, अविनाश मार्तंडे, इंदुमती अलगोंडा ही प्रमुख नेतेमंडळी होती. तर आमदार सुभाष देशमुख यांनी उभ्या केलेल्या पॅनलमध्ये त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी, आप्पासाहेब पाटील, चनगोंडा हवीनाळे, धनेश आचलारे त्यांच्यासह इतरांचा समावेश होता. बापूंनी या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे काका साठे, महादेव चाकोते, जाफरताज पाटील, बाळासाहेब शेळके या नेत्यांची मदत घेतली होती. त्याचा ग्रामपंचायत मध्ये निश्चितच फायदा झाला.


रविवारी या निवडणुकीसाठी तब्बल 96 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी सुरुवातीला सर्वात हॉट समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत मतदार संघाचे मतमोजणी घेतली. या मध्ये आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलने बाजी मारत चार पैकी तीन जागा जिंकल्या. सर्वसाधारण मधून मनीष देशमुख, रामप्पा चीवडशेट्टी तर अनुसूचित जाती मतदारसंघातून अतुल गायकवाड हे तिघे विजयी झाले. आर्थिक दुर्बल मधून मात्र यतीन शहा यांना पराभवाचा धक्का बसला त्या ठिकाणी कल्याणशेट्टी समर्थक सुनील कळके हे विजयी झाले. ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर रवी रोकडे आणि संगमेश बंगले पाटील यांना पराभवाचा धक्का बसला.


मनीष देशमुख यांनी पहिलीच निवडणूक जिंकल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला त्यांच्या जल्लोषासाठी मतमोजणी केंद्राबाहेर युवा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

@ग्रामपंचायत सर्वसाधारण

मनीष देशमुख 635

रामपा चिवडशेट्टी 614

गणेश वानकर 479

संगमेश बगले पाटील 371


@ग्रामपंचायत अनुसूचित जाती

अतुल गायकवाड 589

रवी रोकडे 518


@ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल

सुनील कळके 570

यतीन शहा 537


व्यापारी मतदारसंघातून संघटनेने दिलेले उमेदवार मुस्ताक चौधरी व वैभव बरबडे हे दोघे विजय झाले आहेत. त्यांनी अमोल बिराजदार व मल्लिनाथ रमणशेट्टी यांचा पराभव केला. या निवडणुकीत लिंगायत समाज एकवटलेला पाहायला मिळाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाले होते परंतु संघटनेने दिलेले दोन्ही उमेदवार विजयी झाले.

@मिळालेली मते

मुस्ताक चौधरी 623

वैभव बरबडे 661

अमोल बिराजदार 535


हमाल तोलार मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने समर्थक गफार जब्बार चांदा हे सुमारे 111 मतांनी निवडून आले आहेत. यापूर्वी चार वेळा त्यांनी निवडणूक लढवली परंतु यावेळी त्यांना यश मिळाले. (गफार जब्बार चांदा 373, शिवानंद पुजारी 262, भीमराव सीताफळे 160, दिपक गडगे 131)


सोसायटी मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली असून सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण महिला आर्थिक दुर्बल आणि इतर मागासवर्ग या सर्व 11 ते 11 उमेदवार तब्बल 800 मताच्या फरकाने विजयी झाले आहेत. सोसायटी मतदारसंघातून कपबशीला मतदारांनी स्वीकारले असून नारळ नाकारला आहे. या निकालाने दिलीप माने व सुरेश हसापुरे यांची सोसायट्यांवर असलेली पकड पुन्हा एकदा स्पष्ट झाली.


 


सोसायटी मतदारसंघ

*श्रीशैल नरोळे*1244

*उदय पाटील*1276

*प्रथमेश पाटील*1268

*नागण्णा बनसोडे*1276

*दिलीप माने*1362

*राजशेखर शिवदारे*1366

*सुरेश हसापुरे*1355


सोसायटी महिला राखीव मतदारसंघ

इंदूमती अलगोंडा 1327

अनिता विभुते 1288


सोसायटी इतर मागासवर्ग

अविनाश मार्तंडे 1345


सोसायटी आर्थिक दुर्बल

सुभाष पाटोळे 1243


निकालानंतर बाहेर पडताना मनीष देशमुख आणि संचालक सुरेश हसापुरे यांची भेट झाली या दोघांनीही राजकीय संस्कृती जपत एकमेकांची गळाभेट घेतली.




या निकालानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत दिलीप माने, सुरेश हसापुरे राजशेखर शिवदारे आणि त्यांच्या पॅनलच्या विजयी उमेदवारांनी विजय सर्टिफिकेट घेतले.

विजयानंतर कार्यकर्त्यांनी मतदान मोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. ग्रामपंचायत मध्ये आलेल्या अपयशाचे आम्ही सर्व नेते चिंतन करू अशी प्रतिक्रिया देताना हा विजय सर्वसामान्य शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा असल्याचे सचिन कल्याणशेट्टी यांनी दिलीप माने यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा