*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
संघर्ष प्रतिष्ठान आणि ह्युमन राईटस् ब्लॉक कमिटी माळशिरस यांचे संयुक्त विद्यमाने व ह्युमन राईटस् प्रखर शोध मोहिम संस्था राष्ट्रीय अध्यक्ष अभिमन्यु गवळी, राष्ट्रीय सचिव राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील किर्तीनगर,शंकररनगर-अकलूज येथे महामानव,विश्वरत्न, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक,शैक्षणिक व सिनेक्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान पुरस्कार सोहळा आयोजन करण्यात आले होता.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ॲड.धनंजय बाबर होते व यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.हा कार्यक्रम संघर्ष प्रतिष्ठान आणि ह्युमन राईटस् ब्लॉक कमिटी माळशिरस यांच्या वतीने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ गायकवाड तर प्रमुख अतिथी सज्जनभाऊ लोखंडे,सुधीरभाऊ साठे हे उपस्थित होते.यावर्षी प्रथमच किर्तीनगर येथे जयंती प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा करण्यात आला.या प्रसंगी प्रथम सिनेक्षेत्रातील सिनेअभिनेत्री सौ.जयश्री बिरलिंगे,सिने अभिनेत्री माधवी साठे, सिनेअभिनेता धनंजय जामदार, सिनेअभिनेता सोमनाथ वैष्णव, सिनेअभिनेता रणजित कडाळे, सिनेनृत्यांगना संस्कृती गांधी यांचा संघर्ष प्रतिष्ठान आणि ह्युमन राईटस् ब्लॉक कमिटी माळशिरस यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते सतिश अडगळे,सामाजिक कार्यकर्ते सज्जनभाऊ लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते दिपकभाऊ खंडागळे,सामाजिक कार्यकर्त्या व आयुर्वेद तज्ञ सौ.रजनी साळवे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत संघर्ष प्रतिष्ठान व ह्युमन राईटस् ब्लॉक कमिटी माळशिरस यांचा गौरव करण्यात आला.तसेच प्रथमच शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्काराचे मानकरी कोल्हापुरचे वैभव सावंत सर (दत्त कॉम्युटर) यांना व वरील मान्यवरांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड.धनंजय बाबर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य सतिश शिंदे,सचिन सोनवणे,बाबासाहेब ननवरे यांनी व मान्यवरांनी डॉ.बाबासाहेबांचे जीवनचरित्रवर विचार व्यक्त केले.यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर,पुरस्कारार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्नील शिरसट यांनी सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंढरीनाथ थोरात यांनी केले. अल्पोउपहारानंतर कार्यक्रम समारोप करण्यात आला.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संघर्ष प्रतिष्ठान,किर्तीनगरचे अध्यक्ष स्वप्नील शिरसट व कार्यकर्ते रोहन शिरसट,आकाश भोरकडे,हरिदेव शिरसट,विशाल कदम,सागर हेगडे,निखिल ढवळे,अमोल थोरात,शिवम शिंदे,विशाल ढवळे,अभिषेक थोरात,साईनाथ शिंदे,कुणाल भालेराव,ऋतिक शिंदे,निखिल थोरात,तुषार कदम,श्रेयश पाटोळे,सुजय चिनगे,सुशांत थोरात,सिद्धेश्वर भोरकडे,चैतन्य चिनगे,नवनाथ हेगडे व ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा