*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
परिविक्षाधीन आय.पी.एस अंजना किष्णा व्ही एस मॅडम यांची अवैध्यरित्या गुटखा वाहतुक करणा-या वाहनावर कारवाई करुन एकून २५,२३,७६०/- रुपयाचा मुदेदमाल हस्तगत करण्यात आला
याबाबत सविस्तर वृत्त असे की
दि.१२/०४/२०२५ रोजी मा परिविक्षाधीन आय.पी. एस अंजना किष्णा व्ही एस प्रभारी अधिकारी पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे यांना बेकायदेशीर पणे अवैध्य गुटखा वाहतुक करणारे वाहनाची माहीती मिळाल्याने त्या प्रमाणे ग्रामीण पोलीस ठाणे येथे पथक तयार करुन, खाणा करुन सदर गाडीचा पीराची कुरोली ता पंढरपुर येथुन पाटलाग करत टेंबुर्णी पोलीस ठाणे हददीतील परीते गावाजवळ हॉटेल शेळकेवाढा येथे सदर वाहन पकडले. सदर चालकास वाहनाची व वाहनातील मालाबाबत चौकशी केली असता सदर वाहनात सुगंधी गुटखा सुपारी व सुगंधी तंबाखु असलेलेबाबत सांगीतल. सदर वाहन चालक नामे संतोष मोहोन नकाते रा वासुद आकोला ता सांगोला जि सोलापुर त्याचे सोबत असलेला इसम नामे अनिल सुखदेव बेहरे रा बेहरे चिंचोली ता सांगोला जि सोलापुर असे यांचे विरुध्द कारवाई करुन एक बुलेरो पीकअप त्याचा आरटीओ नंबर एमएच ४५ ए एफ २३०७ व त्यातील सुगंधी गुटखा सुपारी व तंबाखु असा एकुण २५,२३,७६०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. व संबधीत इसम यांचेवर टेंबुर्णी पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करणयात आला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर सोो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर श्री. अर्जुन भोसले सोो, यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा पोलीस अधिक्षक अंजना कृष्णा मॅडम प्रभारी अधिकारी पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे, पोसई विरसेन पाटील पोहेकॉ/राहुल शिंदे, पोकॉ/अजित मिसाळ, सुनिल लोंढे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा