*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
*पत्रकार सांगली*
*मो:--8983 587 167
जगातील *स्वर्ग* म्हणून ज्याचा नामोल्लेख होतो त्या *काश्मीर* मधील पहलगाम येथे 26 निरपराध भारतीयांची झालेली निर्घृण हत्या सुनियोजित *षडयंत्राचा* भाग आहे. या भ्याड हल्याचा "जाहीर निषेध" ..*जाहीर निषेध* ! आणि भावपूर्ण श्रद्धांजली !
*भारतात जातीय तेढ वाढावे म्हणूनच "नावं" विचारून हत्या !*
भारतात 1400 पेक्षा जास्त जाती - जमाती *शांतनेने* आणि आंनदाने येथे नांदत आहेत. भारतात याच *सर्वधर्मसमभावाच्या* उदात्त विचाराला "काळिमा" फासण्यासाठी," हिंदू बांधवांच्या" मनात *द्वेष* निर्माण होण्यासाठी , त्यांच्या भावना "भडकावण्यासाठी" , एकमेकांच्या मनात *दुफळी* निर्माण होण्यासाठी पहलगाम येथे जाणीवपूर्वक "जात विचारून *हत्याकांड* "घडवले" गेले असावे असा "कयास" आहे. भारतात यापूर्वी कित्येक हल्ले झालेत परंतु कधीही *जात* विचारून गोळ्या झाडल्या गेल्या आहेत का ?? मग आत्ताच हा प्रकार का घडला ???
काश्मीरमध्ये आत्तापर्यंत कित्येक हल्ले झाले आपण निषेध केला,परंतु *सरकारला* , सत्ताधार्यांना काहीच फरक पडला नाही. परंतु आज जे घडले आहे त्यातून भारतात *भाषिक "अस्थेर्य*" यावे , हा "कुटील डाव" दिसतं आहे.
भारतात याआधी "कारगिल" हल्ला ,उरी हल्ला ,अमरनाथ हल्ला, *पुलवामा* हल्ला,पठाणकोट हल्ला, संसद हल्ला , कंधार हल्ला, असे 25-30 आतेरिकी हल्ले झाले आहेत.
पुलवामा मध्ये *बस* मध्ये *RDX* कोठून आले ??? याचे "उत्तर" मिळत नाही, जनता निद्रिस्त आहे, पंतप्रधान , गृहमंत्री यांच्या *राजीनाम्यासाठी* दबाव येत नाही, सरकारला काहीच "फरक" पडत नाही, त्यामुळेच जातीयवाद *उफाळण्यासाठी* "जात" विचारून केलेली पाकिस्तान ची ही "चाल" असून ,पाकिस्तान वर अजिबात *दया - माया* न दाखवता पाकिस्तान चे "नावं" जगाच्या नकाशातून *नष्ट* करण्याची आज वेळ आलेली आहे असे वाटते.
*भारतीयांचे प्राण वाचवण्यासाठी मुस्लिम शहीद ..पण गोदी मीडियाची डोळ्यावर पट्टी !* पहलगाम येथे हल्ला होतं असताना *आदिल* नावाच्या घोडेस्वाराने आतेरिक्यांना रोखले होते, पर्यटकांना न मारण्यासाठी विनवणी केली परंतु त्या नराधमांनी त्याच्यावर *गोळ्यांचा पाऊस* पाडला आणि तो मुस्लिम आदिल *शहीद* झाला. हल्ला झाल्यानंतर स्थानिक मुस्लिमांनी, गाईडनीं वर अडकलेल्या पर्यटकांना खाली घेऊन गेले. काही पर्यटकांची "मुले" *हरवली* होती त्यांना स्थानिक मुस्लिमांनी नातेवाईकांच्या सुपूर्द केले, काही पर्यटकांना *विनामूल्य* घोड्यावरून खाली "सुखरूप" सोडले, कित्येक घोडेस्वार *रडत* होते,त्यांना अतीव दुःख होतं होते, कारण पाहुणे असणाऱ्या पर्यटकांची अमानुष हत्या झाली होती. *स्थानिक मुस्लिमांनी* सर्व पर्यटकांची काळजी घेतली. *विमान कंपन्यांनी* या घटनेचा गैरफायदा घेत *5 पट भाडे* घेतले परंतु स्थानिकांनी, मुस्लिमांनी आपल्या घरात, दुकानात थांबवत उर्वरित पर्यटकांची सर्वोतपरी "मदत" केली ,त्याशिवाय तेथील *हॉटेल* मालकांनी पर्यटकांकडून *पैसे* घेतले नाहीत, परंतु एकाही "गोदी मीडिया" ने याची "नोंद" न घेता केवळ "जात" विचारून हल्ला झाला याची "री ओढत" *हिंदू - मुस्लिम* बांधवांमध्ये "जातीय तणाव" व्हावा या दृष्टीने माहिती दिली. भारतात *तणाव* निर्माण व्हावा हा उद्देश अतिरेक्यांचा असावा , व त्यालाच *खतपाणी* घालण्याचे कामं बिकाऊ *गोदी मीडिया* करत नसावेत ना ?? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
*सुरक्षा यंत्रणेचे अपयश , गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा !*
कश्मीर मध्ये *पर्यटन* व्यवसायाला "सुवर्णं दिवस" आलेले आहेत.असे असताना पर्यटन व्यवसायाला "ब्रेक लावण्यासाठी", पर्यटकांवर भीती घालण्यासाठी पाकिस्तान नेहमीच प्रयत्नशील असतो. *अक्षम्य दिरंगाई* आणि गाफीलपणा यामुळे पाकिस्तानला फावले गेले. महत्वाचा मुद्दा असा की भारतात सैन्य भरतीला स्थगिती का दिली गेली आहे ??? माजी जनरल "जी .डी बक्षी" यांनी म्हंटले आहे की भारतीय लष्कराची *सैन्य भरती* रोखून लष्कराचा "आकार" *1 लाख 80 हजारांनी* का कमी केला ??? सैन्य कमी करण्याची हीकोणाची "बुद्धिमान" आयडिया होती ?? पर्वतीय प्रदेशात , जंगलात लढण्यासाठी "सेना" हवी असते. तात्पर्य अशा "चुका" झालेल्या आहेत,त्या सुधारून अधिक सैन्य भरती करून पुन्हा असा हल्ला न होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.आणि *पाकिस्तानला* कायमचा "धडा" शिकवावा लागेल.
*बिहारच्या निवडणुका तोंडावर ..आता पहलगाम च्या हल्ल्याचा "गैरवापर" नको !*
निवडणुका जवळ आल्यावरच हल्ले का होतात ??? असा प्रश्न सर्वसामान्यांना आज पडलेला आहे. कारण महिन्याभरात बिहारमध्ये निवडणुकांचा "बिगुल" वाजत आहे.आणि या कश्मीर च्या घटनेचा वापर करत पुन्हा एकदा *जातीय रंग* देण्याचा प्रयत्न होऊ शकतो . विकासाबाबत - प्रगतीबाबत , *बेरोजगारी - गरिबी* याबद्दल चकार शब्द न काढता जातीय राजकारण करून *मते* मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न बिहारमध्ये पाहवयास मिळू शकतो.
असो, पाकिस्तान भारतात *अशांतता* निर्माण करत असेल तर आपण देखील त्याच "कूटनीतीने" उत्तर देत ,ज्यापद्धतीने माजी पंतप्रधान *स्व .इंदिरा गांधी* यांनी पाकिस्तान चे तुकडे करत *बांगलादेशची* निर्मिती केली,आणि पाकिस्तान उध्वस्त करत तसाच *धडा* आता पाकिस्तानला शिकवण्याची वेळ आलेली आहे. *पाकिस्तान* उध्वस्त व्हायलाच हवा ..समस्त भारतीयांची ही *आर्त हाक* आहे.
. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा