*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगरचे इ.५ वी चे ११ विद्यार्थी व इ.८ वी चे २ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये इ.५ वी तील विद्यार्थी शिवशंकर आश्रिनाथ राजमाने याने २६८ गुण,शौर्य संजय बांदल २२६ गुण, सुजित संतोष पाटोळे २१० गुण,कु.प्रतीक्षा शैलेंद्र बोरावके १८० गुण, पृथ्वीराज हेमंत गोरे १७६ गुण,अजिंक्य तानाजी पवार १५० गुण, आरव अतुल शिंदे १४४ गुण,पृथ्वीराज बळीराम चव्हाण १४० गुण, कु. माहेश्वरी निलेश तडवळकर १३८ गुण,वैभव अतिश मंगळवेढेकर १३८ गुण, हर्षल गणेश महाळणकर १३४ गुण, तर इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत संस्कार संतोष मोहोळकर १८६ गुण व कु.वैष्णवी संजय नेवसे हिने १७४ गुण मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेतील सर्व पात्र विद्यार्थी,विद्यार्थिनींचा संस्थेतर्फे व प्रशालेतर्फे भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन शनिवारी प्रशालेत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे हे होते.या कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार,उपप्राचार्य रितेश पांढरे,पालक,शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांना नवनाथ गायकवाड, वैशाली बनकर,मेघा जोशी,सचिन आतकर,अभिजीत हेगडे,आशा रानमाळ,सुवर्णा पोळ,मनीषा नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी यशस्वी विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षकांचा संस्थेतर्फे व प्रशालेतर्फे भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ गायकवाड यांनी केले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे,व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी अजय गिरमे,खजिनदार ज्योतीताई लांडगे,संचालक अनिल रासकर,ऍड.सचिन बधे,डॉ.अविनाश जाधव,रत्नदीप बोरावके, कल्पेश पांढरे,पृथ्वीराज भोंगळे,दिलीप इनामके, संचालिका लीनाताई गिरमे व विश्वस्त मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा