*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
अकलूज : परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर अकलूज येथे "डॉ. बी. आर. आंबेडकर चषक २०२५" या माळशिरस तालुका प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही भव्य स्पर्धा २८ एप्रिल ते ४ मे २०२५ या कालावधीत विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल, अकलूज येथे पार पडणार आहे.
या प्रथमवर्षीच्या स्पर्धेत तालुक्यातील १४ नामवंत संघांचा सहभाग असून क्रिकेटप्रेमींना उच्च दर्जाचे सामने पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. स्पर्धेचे आयोजक डॉ. बी. आर. आंबेडकर चषक कमिटी असून त्यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले आहे.
विजेत्यांना खालीलप्रमाणे आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत: प्रथम क्रमांक विजेत्याला एक दुचाकी गाडीसह ₹१,००,१३४ रुपये रोख तसेच
द्वितीय क्रमांक: ₹६०,१३४ तृतीय व चतुर्थ क्रमांक: प्रत्येकी ₹३०,१३४ विशेष पुरस्कार: विजेता संघास आकर्षक किट बॅग ही स्पर्धा तालुकास्तरावर एक नवा आयाम ठरणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम क्रिकेटचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा